अबू आझमी यांच्या त्या वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळः निलंबनाच्या मागणीवर सत्ताधारी ठाम गोंधळामुळे अखेर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी बाकावरील आमदारांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या औरंगजेबबद्दलच्या वक्तव्यावरून एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणीवरून भाजपा दोन्ही शिवसेनेकडून एकच गोंधळ घालण्यात येऊ लागला. त्यामुळे विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १० मिनिटासाठी नंतर अर्ध्यातासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

विधानसभा सभागृहाचे कामकाज सकाळी सुरु झाल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा प्रवेश होताच भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी अबू आझमी यांच्या औरंगजेब विषयीचा मुद्दा उपस्थित करत निलंबनाची मागणी केली. त्यानंतर भाजपाचे अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत आदींनीही अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून निलंबनाची मागणी केली. त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनीही औरंगजेबाच्या वक्तव्यावरून अबू आझमी यांच्या अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. सत्ताधारी आणि विरोधकांनी अशा पद्धतीने अबु आझमी यांच्या औरंगजेब विषयीच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत अबु आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तारांकित प्रश्नोत्तरांची सुरूवात होण्याआधीच सत्ताधारी आमदारांनी अबु आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. आमदार सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर आणि मंत्री उदय सामंत यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विरोधी पक्षाने या गदारोळात संयमित भूमिका घेतली, मात्र सत्ताधारी आमदार आक्रमक राहिले. विधानसभेतील शिवसेना उबाठा नेते भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी मिळताच सत्ताधारी पक्षाने गोंधळ वाढवला. अखेर गोंधळाच सभागृहाचे कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

About Editor

Check Also

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा, तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाई नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले

नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *