राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच ५० हजार रूपयांचा दंडही ठोठावला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी आणि आमदाराकीवर निर्णय केव्हा अशी विचारणा विरोधकांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून …
Read More »नीलम गोऱ्हे यांच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली मोठी प्रतिक्रिया… उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेने नीलम गोऱ्हे यांची सावध भूमिका
दिल्लीतील साहित्य संमेलनात मी कसा घडलो या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना मुलाखत वजा कार्यक्रम करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया देत …
Read More »नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप, मात्र संजय राऊत यांच्या प्रत्युत्तरावर सावध दिल्लीतील साहित्य संमेलनात आम्ही कसे घडलो कार्यक्रमात बोलताना गोऱ्हे यांचा आरोप
९८ व्या अखिल भारतीय साहित्य समंलेनाच्या निमित्ताने दिल्लीत सध्या राज्यातील साहित्यिक, प्रेक्षक-वाचक यांच्याबरोबरच राजकिय नेत्यांची वर्दळही सुरु आहे. आज साहित्य संमेलनस्थळी मी कसा घडलो या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना बोलविण्यात आले. यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या मुलाखत वजा कार्यक्रम पार पडली. यावेळी …
Read More »उच्च न्यायालयाचे मत, महिलेच्या शारीरिक स्वातंत्र्याला प्राधान्य देणे गरजेचे २८ आठवड्यांच्या पीडितेला गर्भपातास परवानगी
कथित लैंगिक अत्याचाराचा बळी ठरलेल्या १८ वर्षीय तरूणीला २८ आठवड्यांत गर्भपात कऱण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. शारिरीक स्वातंत्र्याची निवड करण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने यावेळी नमूद केले. उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी सांगितले की, बाळाला जन्म द्यायचा की नाही याची निवड कऱण्याचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा याचिकाकर्तीला अधिकार आहे. त्यामुळे तिचे स्वातंत्र्य आणि निवडीच्या …
Read More »कर्जदारांसाठी आरबीआयने आणले नवे धोरणः परिपत्रकही केले जारी फोरक्लोजर शुल्क आणि प्री-पेमेंट दंडाबाबतही महत्वपूर्ण निर्णय
२१ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या मसुदा परिपत्रकानुसार, कर्जांवर फोरक्लोजर शुल्क आणि प्री-पेमेंट दंड आकारण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सर्व कर्जदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तावित केली आहेत. केंद्रीय बँकेला सर्व नियमन केलेल्या संस्थांनी (REs) व्यक्ती आणि सूक्ष्म आणि लघु उद्योगांनी (MSEs) घेतलेल्या व्यवसायाच्या उद्देशाने घेतलेल्या सर्व फ्लोटिंग रेट कर्जांवरील …
Read More »नासामध्ये इटर्नशिप करायचीय मग, अर्जाची मुदत आणि प्रक्रिया समजून घ्या पात्रता जाणून घ्या, वर्षातून दोन वेळा होते नासाची इंटर्नशिप
नासा अर्थात नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) आता त्यांच्या २०२५ च्या पेड इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज स्वीकारत आहे. या इंटर्नशिप केवळ विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) मध्ये प्रत्यक्ष अनुभव देत नाहीत तर पदवीनंतर पूर्णवेळ रोजगाराचा थेट मार्ग म्हणून देखील काम करू शकतात. नासाचे ऑफिस ऑफ स्टेम STEM एंगेजमेंट (OSTEM) …
Read More »ज्येष्ठ नागरिक बचत योजना मार्चमध्ये किती रकमेवर कर भरावा लागणार एकरकमी गुंतवणूक आणि या योजनांचा पर्याय समोर
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही विशेषतः भारतात राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींसाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना उच्च दर्जाची सुरक्षा आणि कर लाभांसह उत्पन्नाचा विश्वासार्ह स्रोत प्रदान करते. भारतात राहणाऱ्या पात्र ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न तसेच कर लाभ मिळविण्यासाठी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे योजनेत एकरकमी रक्कम गुंतवण्याचा पर्याय आहे. पोस्ट ऑफिसद्वारे …
Read More »सुनिल मित्तल यांना यूकेचा नाईट कमांडर ऑफ द…पुरस्काराने सन्मान यूके-भारत व्यावसायिक योगदानाच्या पार्श्वभूमीवर दिला पुरस्कार
भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना २२ फेब्रुवारी रोजी यूके-भारत व्यावसायिक संबंधांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (KBE) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील ब्रिटीश उच्चायुक्तांच्या निवासस्थानी झालेल्या औपचारिक समारंभात सुनिल मित्तल यांना हे पदक प्रदान करण्यात …
Read More »रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर शक्तीकांत दास आता पंतप्रधान मोदी यांचे सचिव २२ फेब्रुवारी रोजी दुसरे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती
इतिहास विषयात एम ए पर्यंतचे शिक्षण घेतलेले आणि महसूल विभागाचे सचिव म्हणून काम पाहिलेले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेचा यशस्वीरित्या कार्यभार पूर्ण केला. त्यामुळे माजी गर्व्हनर शक्तीकांत दास यांची नियुक्ती २२ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. शक्तीकांत दास …
Read More »राष्ट्रवादीच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार लहू कानडे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली निवड जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज नियुक्ती केली आहे. अनिल भाईदास पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे …
Read More »
Marathi e-Batmya