नीलम गोऱ्हे यांच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली मोठी प्रतिक्रिया… उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेने नीलम गोऱ्हे यांची सावध भूमिका

दिल्लीतील साहित्य संमेलनात मी कसा घडलो या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना मुलाखत वजा कार्यक्रम करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया देत नीलम गोऱ्हे यांना सावध भूमिका घेण्यास भाग पाडले. मात्र त्यावर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नीलम गोऱ्हे यांनी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यानंतर एक पद मिळते असा गंभीर आरोप केला. नीलम गोऱ्हे यांच्या या आरोपाला संजय राऊत यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर देत म्हणाले की, आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना चार वेळा आमदार केले. त्यांनी दिलेल्या मर्सिडीजच्या पावत्या त्यांच्याकडे असतील तर त्यांनी त्या पावत्या घेऊन याव्यात असे उपरोधिक आव्हानही दिले.

त्यावर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, जाऊ दे, ते गऐ गुजरे लोग आहेत, त्यांच्या वक्तव्यावर काय भाष्य करायचे, मी काही त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही त्याकडे दुर्लक्ष करायचे असे सांगत अधिक भाष्य करण्यापेक्षा त्याकडे अप्रत्यक्ष दुर्लक्ष केले. मात्र संजय राऊत यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर उद्धव ठाकरे समाधानी असल्याचे दिसून आले.

तर दुसरीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे याच्या प्रतिक्रीयेवर दिल्लीत असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी सावध भूमिका घेत म्हणाल्या की, मला आमदार करण्यात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वाची आहे. पण त्यांनी कधी माझ्याकडे पैसे मागितले नाहीत, कारण त्यांना माहित होते की, मी आर्थिक व्यवहार करत नाही. पक्षानेही मला एक पैसा कधी मागितला नाही, पण त्यावेळी पक्षातील दुसरे लोग मात्र याबाबत मला सांगतायत, आजही मला सांगत असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आज शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत हे बोलत होते.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी  महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर आज प्रदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *