Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या नाही तर पालिका अधिकारी कोणाच्या आदेशाचे पालन करतात ? उच्च न्यायालयाची बृहन्मुंबई महानगरपालिकेला सवाल

विकास आराखडा (डीपी) रस्ता संरेखित करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असतील, तर मग पालिका अधिकारी नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करतात? असा सवाल नुकतेच उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिका प्रशासानाला केला. पालिका अधिकाऱ्यांना कसलीच भिती नाही राहिली आहे का?, खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश …

Read More »

पवन खेरा यांची टीका, …धोकेबाजी केलेल्या खोके व धोके सरकारचे शेवटचे १५ दिवस काँग्रेसच्या योजनांबद्दल खोटी जाहिरबाजी करणाऱ्या भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट केली आहे. भाजपा सरकारचे भ्रष्टाचाराचे विक्रम पाहता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही लाज वाटेल. टक्केवारी व कमीशनखोरी करुन खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला धोका देणाऱ्या धोकेबाज व खोकेबाज सरकारचे शेवटचे १५ दिवस …

Read More »

ॲड प्रकाश आंबेडकर यांचे भाकित, विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार तर वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या!

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आले आहे. उद्या विधानसभेच्या माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्या यामधील आरक्षण थांबवले जाईल. हे आपल्याला मान्य आहे का ? मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले ओबीसींचे, एससी, एसटी आणि मुस्लीम उमेदवार की ज्यांची निशाणी गॅस सिलिंडर आहे …

Read More »

किरण रिजीजू यांची टीका, संविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही राहुल गांधी यांच्यावरही घणाघाती टीका

संविधानाची अनेकदा मोडतोड करणाऱ्या आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणाऱ्या काँग्रेसला जनता यावेळी माफ करणार नाही, असे सांगत आतापर्यंत केलेल्या संविधानाच्या अवमानाबद्दल आधी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी संसदीय कार्य मंत्री किरण रिजीजू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपा मिडिया सेंटर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत किरण रीजिजू …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची माहिती, काँग्रेसच्या प्रचाराला खर्गे, राहुल-प्रियंका गांधी यांच्या सभा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या प्रमुख उपस्थितीत १० नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार

वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकिर्दीत भारताला व्यापारी संघर्षाचा सामना करावा लागू शकतो डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिका फस्ट धोरण

डोनाल्ड ट्रम्प यांनी “अमेरिका फर्स्ट” ठेवण्याचे त्यांचे राजकीय वचन अंमलात आणल्यामुळे पोलाद, कापड, वस्तू आणि माहिती तंत्रज्ञानासह अमेरिकेच्या बाजारपेठेशी संपर्क असलेल्या भारतीय उद्योगांना अल्पकालीन व्यत्यय येऊ शकतो. तथापि, पुरवठा साखळी पुनर्स्थापनेपासून भारताला होणारा मध्यम-मुदतीचा फायद्यामुळे या हेडविंड्सची भरपाई होण्याची शक्यता आहे, कारण ट्रम्प 2.0 अंतर्गत चीनच्या रणनीतीपासून जोखीम कमी करणे …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा नियमः निवृत्तीपूर्व रेकॉर्ड व्हिरिफिकेशन गरजेचे पेन्शन लागू होण्यापूर्वी नियमानुसार व्हेरिफिकेशन आवश्यक

निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW) १८ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या आणि त्यांच्या निवृत्तीपूर्वी पाच वर्षे शिल्लक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पात्रता सेवेची नियमित पडताळणी आवश्यक असलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या DoPPW ने जारी केलेल्या ऑफिस मेमोरँडमनुसार, हे पडताळणी …

Read More »

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्पः भारतीय शेअर बाजारात उसळी निफ्टी आणि बीएसईच्या शेअर बाजार वधारला

डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसवर पुन्हा दावा करण्याच्या तयारीत असल्याने भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी नफा वाढवला. दुसऱ्या दिवशीही नफा सुरू ठेवत दलाल स्ट्रीटवर बैलांची कूच सुरू आहे. निफ्टी 50 २१८ अंकांनी किंवा ०.९०% वर २४,४३२ वर होता तर सेन्सेक्स ७७० अंकांनी किंवा ०.९७% वर ८०,२४५ वर होता, ८०,००० ची महत्वाची पातळी …

Read More »

सेवानिवृत्ती नंतरचे प्लनिंग करतायः मग या १० टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील कर्ज आणि उत्पन्न आणि खर्चाचे कसे कराल नियोजन

सेवानिवृत्तीपूर्वी कर्जमुक्त स्थिती प्राप्त केल्याने तुम्हाला लक्षणीय आर्थिक स्वातंत्र्य आणि शांतता मिळू शकते. हे ध्येय गाठण्यासाठी, तुमचे उत्पन्न, खर्च आणि कर्ज परतफेडीची उद्दिष्टे यांचा तपशील देणारे व्यावहारिक बजेट तयार करणे आवश्यक आहे. तुमच्या उत्पन्नाचा विशिष्ट भाग तुमच्या कर्जाची पुर्तता करण्याच्या उद्देशाने नियुक्त करा. याव्यतिरिक्त, अनावश्यक खर्च कमी करण्याचा आणि त्या …

Read More »

निवा बुपा हेल्थ इन्सुरन्सचा आयपीओ या दिवशी बाजारात आयपीओची किंमत ७०-७४ रूपये असणार

निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स (पूर्वीचे मॅक्स बुपा) ने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) द्वारे २,२०० कोटी रुपये उभारण्यासाठी सेबी SEBI कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा दाखल केला आहे. ऑफरमध्ये विक्रीसाठी ऑफर (OFS) आणि शेअर्सचा नवीन इश्यू या दोन्हींचा समावेश आहे. खाजगी इक्विटी फर्म ट्रू नॉर्थ, ज्याने २०१९ मध्ये मॅक्स इंडियामध्ये ५१% …

Read More »