रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती, मोदी- शाहच्या भाजपाने डॉ आंबेडकरांचा सन्मानच केला अमित शहा यांनी नाही ; काँग्रेसनेच अनेकदा डॉ आंबेडकरांचा अवमान केला

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जेंव्हा जेंव्हा सन्मान करण्याची वेळ आली तेंव्हा तेंव्हा काँग्रेस ने पाठ दाखवली आहे.काँग्रेस ने डॉ.बाबासाहेबांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव केला.त्यांना भारतरत्न किताब दिला नाही.काँग्रेस केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेते ; संविधानाचे नाव घेते प्रत्यक्ष संविधानाच्या नावाने कोरी पुस्तके वाटतात.फक्त संविधान दाखवतात.संविधान आणि संविधानकार महामानवाला सन्मान देत नाहीत.त्यांचे विचार मानत नाहीत हेच संगण्याचा प्रयत्न संसदेत अमित शहा यांनी केला.मी त्यावेळी राज्यसभेत उपस्थित होते.अमित शहा हे भाजप चे जबाबदार नेते आहेत. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला नाही तर काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अवमान केला आहे असा हल्लाबोल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस वर केला.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाने कधीही भारतरत्न किताब दिला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या पुढाकारातून भारतरत्न किताब महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महापरिनिर्वाण नंतर ३४ वर्षांनी देण्यात आला. काँग्रेस क्या सरकारला मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब देण्याची आठवण झाली नव्हती. मुंबईत इंदूमिलची जमीन देण्यासाठी १४ वर्षे आंबेडकरी जनतेने संघर्ष केला. मात्र काँग्रेस सरकारने ती जमीन दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ इंदु मिलची जमीन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला दिली. तेथे १ हजार कोटी खर्च करून जागतिक दर्जाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे राहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपा एनडीए सरकार ने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक स्मारकाचे काम मार्गी लावल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान हा मनापासून झाला पाहिजे. काँग्रेस फक्त दिखाऊपणा करीत आहे. अमित शाह यांनी काँग्रेसने कसा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला; डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित काम काँग्रेसने का केले नाही? बाबासाहेबांना अपेक्षित ३७० कलम हटविण्याचे काम काँग्रेसने का केले नाही? डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न का दिला नाही? काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा दोन वेळा पराभव करून त्यांचा अवमान केला. काँग्रेसच्या चुका दाखवण्याचे काम गृहमंत्री अमित शाह यांनी दाखवले. त्यापासून धडा घ्यायचे सोडून काँग्रेस पुन्हा खोटा खोडसाळ प्रचार करीत आहे. अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला नाही. मात्र काँग्रेस ने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अवमान केला याला इतिहास साक्षीदार आहे असे सांगत काँग्रेसच्या खोट्या प्रचाराच्या वृत्तीचा धिक्कार केला.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांचे आदेश, हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’ वापराचा उल्लेख बंधनकारक महाराष्ट्रापाठोपाठ केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाकडूनही सूचना

पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *