Breaking News

केंद्र सरकार भांडवली खर्चात कपात करणार कॅगच्या अहवालानंतर केंद्राचा निर्णय

वित्त मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “खर्चाची गती कमी झाल्यामुळे केंद्र सरकार FY25 साठी भांडवली खर्चाचे (CAPEX) लक्ष्य कमी करण्याची शक्यता आहे. सरकारने सुरुवातीला FY25 साठी ११.११ लाख कोटी रुपयांचे CAPEX लक्ष्य ठेवले होते, जे FY24 साठी ९.४८ लाख कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा १६.९% वाढ दर्शवते. तथापि, वित्तीय व्यवस्थापनाशी संबंधित आव्हाने …

Read More »

मोठा निर्णयः ईपीएफओने व्हिपीएफच्या व्याज दरात केली वाढ २.५ लाख रूपये मर्यादा वाढविण्याचा सरकारचा विचार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या कक्षेत स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी (VPF) मध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा सध्याच्या २.५ लाख रुपयांवरून वाढवण्याचा सरकार विचार करत आहे. सध्या, २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त मिळणारे कोणतेही व्याज कर आकारणीच्या अधीन आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट कमी-मध्यम आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना ईपीएफओ EPFO ​​द्वारे …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अश्लील साहित्य’ म्हणून कलाकृती नष्ट करू नका सीमाशुल्क विभागाला करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

‘अश्लील साहित्य’ असल्याच्या कारणावरून गेल्यावर्षी जप्त केलेल्या प्रसिद्ध कलाकार एफ.एन.सौझा आणि अकबर पदमसी यांच्या कलाकृती (पेंटिंग) पुढील आदेश येईपर्यंत नष्ट करू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने सीमाशुल्क (कस्टम) विभागाला दिले. व्यावसायिक आणि कलेचे जाणकार असलेले मुस्तफा कराचीवाला यांच्या मालकीच्या बीके पॉलिमेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. …

Read More »

विधानसभेसाठी काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहिर, यांना उमेदवारी निश्चित अनेक नवे चेहरे आणि विद्यमान आमदारांना काँग्रेसने दिली उमेदवारी

विधानसभा निवडणूकीसाठी आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ४५ उमेदवारांची यादी जाहिर केली. त्यानंतर रात्री उशीराने काँग्रेस पक्षाच्यावतीने ४८ आमदारांची यादी जाहिर केली. आज काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहिर करताना मुंबईतील पाच जागांवरील उमेदवारी जाहिर करत पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघातील उमेदवार …

Read More »

खिचडी घोटाळा प्रकरण : सुरज चव्हाण यांचे अटकेला आणि ईडी कोठडीला आव्हान उच्च न्यायालयाने बजावली प्रतिवाद्यांना नोटीस

कोरोनाकाळात मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांनी अटकेला तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) कोठडीला आव्हान दिले आहे. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवाध्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना १७ जानेवारीला खिचडी घोटाळा प्रकरणी …

Read More »

कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाहीः न्यायालयाचे संजय राऊत यांच्या गैरहजेरीवर खडेबोल पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश

भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला अब्रुनुकसानीप्रकरणी ठोठावलेल्या शिक्षेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, राऊतांच्या अनुपस्थितवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, अशा शब्दात न्यायालयाने खडेबोल सुनावले आणि सुनावणी शुक्रवारी पुन्हा ठेवली. दंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात संजय राऊत यांनी …

Read More »

भाजपाच्या २६ उमेदवारांचे अर्ज दाखल मान्यवर नेत्यांचीही उपस्थिती महायुतीच्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या एकूण २६ उमेदवारांनी उमेदवारी दाखल करण्याच्या पाहिल्याच दिवशी गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत वाजतगाजत गुरुवारी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित …

Read More »

नांदगांव मतदारसंघासाठी समीर भुजबळ यांचा मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला

नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगांव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत त्या जागेवरून उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह धरला. मात्र नांदगांव विधानसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेची असून तेथून सुहास कांदे हे विद्यमान आमदार …

Read More »

बारामतीत पुन्हा काका-पुतण्यामध्ये सामनाः अजित पवार विरूद्ध पुतण्या युगेंद्र पवार आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचे वारसदार-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास विकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज ४५ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या अनुभवानंतर बारामती विधानसभा निवडणूकही घरच्यांच्या विरोधात निवडूक लढवायची नाही असा निर्णय घेत तशी घोषणा अजित पवार …

Read More »

माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे. सीताराम घनदाट यांना गंगाखेड …

Read More »