माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे.
सीताराम घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे. या वेळी दत्तराव भोसले, मधुसूदन लटपटे, शुद्धोधन सावंत, अमितदादा घनदाट यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश
माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.… pic.twitter.com/IgTQ2R5XIT
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 24, 2024
Marathi e-Batmya