Breaking News

वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवारांची यादी जाहिरः खतीब यांच्यासह ९ मुस्लिम नेत्यांचा प्रवेश काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वावर नाराज नतिकोद्दीन खतीब यांचा ९ अन्य मुस्लीम नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

काँग्रेसच्या सॉफ्ट-हिंदुत्वावर नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खतीब सैय्यद नतीकोद्दीन यांचा इतर ९ मुस्लिम नेत्यांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. मुस्लिम प्रतिनिधीत्व मुद्द्यावर समझोता नाही करू शकत नाही असे खतीब यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबई येथे पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभेच्या काळात मुस्लिमांना उमेदवारी …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारचे ९० कोटी रुपयांचे टेंडर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत मात्र त्याआधी सरकारतर्फे विविध निर्णय घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी ९० कोटीचे टेंडर काढले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती …

Read More »

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा निर्णयः महाराष्ट्रातील या जातींचा समावेश ओबीसीत केंद्रीय सुचींमध्ये समावेश करण्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची हिरवी झेंडा

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील काही जातींचा इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली होती. या शिफारसीच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सखोल तपासणी करीत दिशानिर्देशानुसार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निर्देशान्वये इतर मागासवर्गीय जाती/पोटजातींचा केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास आयोगाने मान्यता दिली. राज्य सुचीतील …

Read More »

एसटी महामंडळाचा मोठा निर्णयः २०१९ च्या भरतीच्या यादीतील उमेदवारांना घेणार १०५८ उमेदवारांना सामावून घेणार-एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती

सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. सन २०१९ च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, सत्तेतील ‘सावत्र भाऊ’ माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण…. मुंबईसह महाराष्ट्रातील महिला असुरक्षित; फडणवीस सर्वात निष्क्रीय व अकार्यक्षम गृहमंत्री

मुंबईच्या वांद्र्यातील निर्मलनगरमध्ये १८ वर्षाच्या तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आणि महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात माताभगिनी सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुण्याच्या बोपदेव भागात विद्यार्थीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला, त्याचे आरोपी अद्याप सापडले नाहीत तोच मुंबईत घटना घडली. दररोज कुठे ना कुठे महिलेवर अत्याचार केल्याच्या …

Read More »

आदिवासी विभागाच्या १२० आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारतींचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न ३,७५० कोटींच्या आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहांच्या इमारतींची प्रथमच निर्मिती

गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आदिवासी बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात ३ हजार ७५० कोटींच्या आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारती बांधून आदिवासी विद्यार्थ्यांना या इमारतींमधून गुणवत्तापुर्ण आणि सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचे काम आदिवासी विकास विभागाने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले. आज नंदुरबारमधून राज्यातील १२० आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारतींचे लोकार्पण, भूमीपूजन …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मोदी-शाहांनी लुटले, काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ लुटीची माहिती… मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत काँग्रेस पक्षाने भाजपा युती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा चित्ररथ बनवला आहे. महाभ्रष्ट युती सरकारने मोदी शाह यांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले आहेत. राज्यातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले आहेत. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी महाराष्ट्राला …

Read More »

सुप्रिया सुळे यांची टीका, तर फडणवीस यांना भाऊ म्हणून मी हार घातला असता… फडणवीसांनी राज्याला भारताची गुन्हेगारी राजधानी केली

पुणे येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे यावर भर दिला आणि महाराष्ट्रातील महिला आणि बालकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात फडणवीस यांनी असमर्थ ठरले. तसेच महाराष्टातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले असून राज्याला भारताची गुन्हेगारी राजधारी म्हणून घोषित केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

आरबीआयचे पतधोरण जाहिरः रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही खाद्यान्नांच्या किंमती रोखण्यावर लक्ष्य केंद्रीय करणार

पुढील पतधोरण निश्चित करण्यासाठी आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेची आज ५१ वी पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या सणासुदीच्या आणि बाजारातील खाद्यांन्नांच्या वाढत्या दर वाढीच्या पार्श्वभूमीवर रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय आज झालेल्या पतधोरण बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सध्या रेपो दर ६.५० टक्के असलेला दर …

Read More »

महायुतीतील तिन्ही पक्षांच्या विधानसभा समन्वयकांची नियुक्ती एकी आणि विकासकामांच्या बळावर महायुतीच राज्यात सत्ता स्थापन करणार

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटकपक्षांमध्ये सामान्य कार्यकर्ता ते बूथ स्तरापर्यंत आवश्यक समन्वय साधण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांचे विधानसभा समन्वयक नियुक्त केल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी बुधवारी दिली. महायुतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी महायुती समन्वयक भाजपा आ. प्रसाद …

Read More »