एसटी महामंडळाचा मोठा निर्णयः २०१९ च्या भरतीच्या यादीतील उमेदवारांना घेणार १०५८ उमेदवारांना सामावून घेणार-एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती

सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.

सन २०१९ च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत आहे. तसेच, प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकते प्रमाणे व रिक्त जागेनुसार रा.प.सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष भरत गोगावले यांना भेटून निवेदन सादर केले होते. त्यांच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना अध्यक्ष भरत गोगावले यांनी ०१.१०.२०२४ रोजीच्या रा.प.महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना नेमणुका देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, या सर्व उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अध्यक्ष भरत गोगावले यांचे आभार मानले आहेत.

About Editor

Check Also

कुर्ला पश्चिमेच्या नौपाड्यात झाड कोसळून अंगावर पडल्याने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू अंगावर झाड पडल्याने ६३ वर्षिय व्यक्तीचा मृत्यू

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रविवारी आणखी एका व्यक्तीचा बळी गेला, जेव्हा एक झाड अंगावर कोसळल्याने एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *