Breaking News

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसह घेतले हे महत्वाचे निर्णय गटप्रवर्तकाच्या मानधनातही केली वाढ

आज रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही नव्या मतदार वर्गाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या वास्तविक २० ऑगस्टपर्यंत कराव्यात असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला देण्यात आले होते. मात्र ह्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय राज्य …

Read More »

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार: योजनेचा विस्तार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० राबविण्यात येत …

Read More »

श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या संरजाम जमिनींची सूट कायम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या संरजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे राज्याच्या इतिहासातील अनन्य साधारण महत्त्व विचारात घेऊन व श्रीमंत भोसले कुटुंबियांची उपजिविका यांच्या दर्जानुसार व्हावी यासाठी …

Read More »

ठाणे येथील क्लस्टर योजनेसाठी महाप्रित ५ हजार कोटी उभारणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

ठाणे येथील महत्वाकांक्षी नागरी पुनर्निर्माण कार्यक्रमांतर्गत क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या महाप्रित या कंपनीस ५ हजार कोटी इतका निधी गुंतवणूकदारांकडून इक्वीटी व कर्जरोख्याच्या स्वरुपात उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेत ६ हजार ४९ कोटी इतका खर्च अपेक्षित असून टेकडी बंगला, हजुरी …

Read More »

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना योजना लागू मात्र मार्च २०२४ पासून लागू होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे समितीच्या …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, अन्यथा श्रीलंका- बांग्लादेशसारखी स्थिती पोलिसांना सत्ताधा-यांच्या जवळच्या गुंड माफियांच्या सुरक्षेला, महिला मुलींची सुरक्षा कोण करणार?

राज्यातील महायुतीचे सरकार जनतेच्या मतदानाने नाही तर गुजरातच्या आशिर्वादाने आले आहे. या महाभ्रष्ट सरकारला मराठी माणसांपेक्षा गुजरातच्या भल्याची जास्त चिंता आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला लुटून गुजरातचे भले करणे हाच एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. राज्याची लूट थांबवून जनहिताची कामे करा अन्यथा तुमची अवस्था श्रीलंका, बांग्लादेशच्या सत्ताधा-यांप्रमाणे होईल असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

बहिणीला…, पण आदिवासी भावांसाठीची १२ हजार ५०० पदे भरायला वेळच नाही अद्याप पदभरतीची जाहिरातच नाहीच; बेरोजगार उमेदवारांचा संतप्त सवाल

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला वर्गाची मते आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून माझी लाडकी बहिण योजना, लखपती दिदी सारख्या योजना जाहिर करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला राज्य सरकारच्या विविध विभागात अनुसूचित प्रवर्गातील आदीवासी समाजाची भरावयाची १२ हजार ५०० हजार पदे रिक्त सरकारनेच विनंती करूनही अद्याप …

Read More »

पेन्शन योजनेवरून मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, यु म्हणजे मोदींचा युटर्न नव्या युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेवरून सोडले टीकास्त्र

केंद्र सरकारने काल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना जाहिर केली. या योजनेवरून काँग्रेसने टीकेची झोड उठविली. युपीएस मधील यु म्हणजे मोदी सरकारचा यु टर्न असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली. केंद्र सरकाच्या काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या सरकारी …

Read More »

पुढील ४ ते ५ दिवस मुंबईसह या जिल्ह्यांना दिला हवामान खात्याने इशारा २५ तारखेला मुंबई आणि महानगरात रेड अलर्ट

राज्यात मागील काही दिवसापासून उघडीप दिली होती. मात्र आता कालपासून पावसाने पुन्हा एकदा आपला हजेरी दाखविण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच त्यामुळे मुंबई, पालघरसह कोकण आणि राज्याच्या काही भागात आज पासून पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार आणि अति मुसळधार …

Read More »

संजय राऊत यांची टीका, मोडतो़ड तांब्या-पितळ सारखी आमची आघाडी नाही महाविकास आघाडीत जागा वाटपांवर ९९ टक्के सहमती

महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून या जागा वाटपाबाबत ९९ टक्के सहमती झाली आहे.  मुंबईतील जागांबाबतही प्राथमिक स्तरावर कालच्या बैठकीत चर्चा झाली असून तसेच पुढेचा मुख्यमंत्री कोण असावा यावरूनही आमच्यात वाद नाही की जागा वाटपांबाबतही वाद नसल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या …

Read More »