गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा जीव गेला होता. डोंबिवली MIDC मधून दर आठवड्याला स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येत आहे. या घटना सतत घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पुढे …
Read More »वर्सोवा खाडीजवळील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट जेसीबी ऑपरेटर राकेश यादव यांच्या कुटूंबियांना ५० लाखांची मदत तर कुटूंबातील एका सदस्याला मिळणार नोकरी
ससूनघर गावापाशी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची महिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने संयुक्त बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वर्सोवा खाडीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून एल अँड …
Read More »काँग्रेसची मागणी, नागपूरमधील चामुंडी कंपनीतील स्फोटाची सखोल चौकशी करा मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत द्या
नागपूर अमरावती रोडवरील धामणालिंगा परिसरातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट होऊन ६ निरपराध कामगारांचा जीव गेल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. दारुगोळा बनवणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करून मृतांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत दिली पाहिजे, तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करुन प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार; आम्ही परत येऊ, वंचित परत येईल भाजपा नागनाथ तर काँग्रेस सापनाथ
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष भाजपाची बी टीम असल्याची टीका केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स ट्विटरच्या माध्यमातून आज संताप व्यक्त करत मी भाजपाची बी टीम आहे …
Read More »त्या अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडिओवर एका सुजाण साहित्यिकाचे कवितेतून उत्तर कवी प्रदीप आवटे यांनी त्यांच्या कवितेतून सदर अभिनेत्रीला दिला सल्ला
मागील दोन दिवसापासून सध्याच्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करणारा एक व्हिडिओ एका मराठी अभिनेत्रीचा भलताच समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे दिवसागणित त्याच्या व्हायरल होण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर सध्याच्या राजकिय परिस्थितीचे आणि राज्य सरकार म्हणून राज्यातील नागरिकांसाठी कायद्याप्रमाणे काही निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र त्या विशिष्ट …
Read More »जीएसटी कौन्सिल बैठक २२ जूनला नव्या सरकारकडून पहिली बैठक कर आकारणी संदर्भात या क्षेत्रांचा विचार करणार
जीएसटी कौन्सिलची बैठक या जून महिन्यात होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन २२ जून रोजी जीएसटी परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान करतील. सार्वत्रिक निवडणुकीनंतर आणि गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरनंतर परिषदेची ही पहिली बैठक असेल. “जीएसटी कौन्सिलची ५३ वी बैठक २२ जून २०२४ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे,” जीएसटी कौन्सिलने X वरील सोशल …
Read More »व्होडाफोनचे कंपनी शेअर्स आता नोकिया आणि इरिक्सन कंपनीकडे १६६ कोटी रूपयांचे शेअर्स दिले या दोन कंपन्यांना
व्होडाफोन आयडियाच्या बोर्डाने गुरुवारी २ हजार ४५८ कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स प्राधान्याच्या आधारावर जारी करण्यास मान्यता दिली. शेअर्स एरिक्सन इंडिया आणि नोकिया सोल्युशन्स आणि नेटवर्क्स इंडिया यांना जारी केले जाणार आहेत. व्यवहारामध्ये १,६६,०८,१०.८०४ पर्यंतचे शेअर्स किंवा रु.१० प्रत्येकी एक याप्रमाणे १६६.०८ कोटी पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्स जारी करण्यात येणार आहे. यापैकी, …
Read More »क्रिसिलचा अहवाल, महागाईचा दर कमी झालेला असला तरी चिंताजनक मान्सूनच्या आगमनानंतर केले भाष्य
ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई किंवा किरकोळ महागाई जरी मे महिन्यात थोडीशी कमी झाली असली तरी अन्नधान्य चलनवाढ ही अर्थव्यवस्थेची चिंताजनक बाब आहे, असे क्रिसिल रेटिंग्सने बुधवारी एका अहवालात म्हटले आहे. १२ जून रोजी, सरकारी डेटामध्ये असे म्हटले आहे की भारताची किरकोळ महागाई एप्रिल मधील ४.८३% च्या तुलनेत मे २०२४ …
Read More »अदानीच्या अंबुजा सिमेंटने खरेदी केली पेन्ना सिमेंट १० हजार ४२२ कोटी रूपयांना झाला व्यवहार
अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने गुरुवारी पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेडचे १०,४२२ कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्यावर अधिग्रहण करण्याची घोषणा केली. अंबुजा ही अदानी सिमेंटची सिमेंट आणि बांधकाम साहित्य कंपनी आहे आणि अदानी समूहाचा एक भाग आहे. “अंबुजा पीसीआयएलचे १०० टक्के शेअर्स त्याच्या विद्यमान प्रवर्तक गट, पी प्रताप रेड्डी आणि कुटुंबाकडून विकत घेईल. या …
Read More »यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) २०२४ ही १६ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून …
Read More »
Marathi e-Batmya