Breaking News

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळ बीआयटी वसाहतीत प्रवेशद्वार उभारा मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांचीमहापालिका आयुक्तांकडे मागणी

परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या बीआयटी वसाहतीपर्यंत पोहचताना अनुयायी तसेच देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना मोठी अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वास्तूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक स्वरुपात विकसित करुन दोन्ही बाजूस डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज मुंबई भाजपा …

Read More »

अनिल परब यांचे आश्वासन, सरकारी नोकरीच्या परीक्षा शुल्क कपातीसाठी लढा देणार राज्य सरकारच्या वाढत्या शुल्क आकारणीवर मुद्दा उपस्थित करणार

राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वर्षातील सर्व परीक्षांसाठीचे एकरकमी पद्धतीने शुल्क घ्यावे. तसेच सध्याच्या परिक्षा शुल्कात कपात करावी यासाठी आपण पदवीधर आमदार म्हणून जोरदार लढा देऊ, अशी ठाम ग्वाही विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ॲड. अनिल परब यांनी नुकतीच भायखळा येथे आयोजित शिवसेना पक्षनेते आणि …

Read More »

नारायण राणे यांचा निवडणूकीतील विजय भ्रष्ट मार्गाने, निवडणूक आयोगाला नोटीस लोकसभा निवडणूकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याची तक्रार

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात घालण्यात यावी यासाठी कायदेशीर नोटिस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला अ‍ॅड. असीम …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक वाहन भत्ताही देण्याचा समावेश करावा

दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येवू न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्व अधोरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

आता तालुकास्तरीय नमो रोजगार मेळावे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून आढावा बैठकीचे आयोजन

तालुकास्तरीय रोजगार मिळावे, नमो महारोजगार मेळावा २०२४ ची पूर्वतयारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातील आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया यासह विभागाच्या कामकाजाचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १८ जून रोजी मंत्रालयात आढावा घेतला. कौशल्य विकास विभागाची येत्या ३ महिन्यांची रूपरेषा ठरलेली असून, तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, नालंदा ही एक ओळख नाही तर आदर आणि अभिमान नव्या नालंदा कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १९ जून रोजी बिहारमधील राजगीर येथील नालंदाच्या प्राचीन अवशेषांच्या जागेजवळ असलेल्या नालंदा विद्यापीठ या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. नालंदा हे भारताच्या शैक्षणिक वारशाचे आणि चैतन्यशील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन करून पंतप्रधान मोदी म्हणाले, पुस्तके आगीच्या ज्वाळांमध्ये जळू शकतात, परंतु अग्नीच्या ज्वाला …

Read More »

भाजपा सरकारविरोधात २१ जून रोजी काँग्रेसचे ‘चिखल फेको’ आंदोलन महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी आंदोलन

राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार २१ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.०० वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध …

Read More »

हज यात्रेत अति उष्णतेमुळे ५५० यात्रेकरूंचा मृत्यू मृत्यूमुखींमध्ये काही भारतीयांचा समावेश असण्याची शक्यता, मात्र बहुतांष इजिस्शियन नागरिक

मंगळवारी परराष्ट्र खात्याने सांगितले की, हज यात्रे दरम्यान किमान ५५० यात्रेकरू मरण पावले असून या वर्षी पुन्हा तापदायक तापमानात परावर्तीत झाले आहे. मात्र या तापमान वाढीमुळे ही यात्रा पुन्हा एकदा दुःखदायक ठरली आहे. मरण पावलेल्यांपैकी किमान ३२३ इजिप्शियन होते, त्यापैकी बहुतेक उष्णतेशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते, असे दोन अरब राजदूतांनी …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, भाजपाला देवेंद्रजींचेच नेतृत्व मोदी सरकारच्या नवीन योजना मतदारांपर्यंत पोहचविणारच; जुलै महिन्यात भाजपाची धन्यवाद यात्रा

महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली. बुधवारी सकाळी नागपूर विमानतळावर चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांशी बोलत होते. तसेच काल …

Read More »

जागतिक स्तरावर सोने साठा वाढविण्याचा प्रयत्न विकसनशील राष्ट्रामधील सोन्याच्या आकडेवर लक्ष

जागतिक मध्यवर्ती बँका त्यांच्या रिझर्व्हमध्ये सोन्याचे होल्डिंग वाढवण्याची योजना आखत आहेत जरी भारतीय किरकोळ ग्राहक उच्च किंमतीमुळे पिवळा धातू टाळू शकतात. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या “सेंट्रल बँक्स गोल्ड रिझर्व्हज” सर्वेक्षणानुसार, जगातील जवळपास ३० टक्के केंद्रीय बँकांनी या वर्षी त्यांच्या स्वत:च्या राखीव निधीमध्ये सोने जोडण्याची योजना आखली आहे. WGC ने …

Read More »