२९ रूग्णांची वाढ, संख्या ६६४ वर पोहोचली पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, बुलढाणा, औरंगबादेत सापडले नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. आज पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद आणि बुलढाण्यात नव्याने २९ रूग्ण सापडले असून सर्वाधिक पुणे येथील आहेत.

पुणे १७, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलढाण्यात ३, औरंगाबादेत २ रूग्ण नव्याने सापडले. राज्यात जवळपास १४ हजार ५०४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १३ हजार ७३८ रूग्णांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर शनिवारी २४ तासात १४५ नव्या रूग्णांचे निदान झाले होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती, प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर

कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *