आरोग्य

ऑक्टोबर हिट तापदायक, सूर्य ओकणार आग ऑक्टोबर हिटच्या झळा आणखी वाढणार; वाचा कसं असेल हवामान

ऑक्टोबर झाल्यानंतर तापमानाचा ताप अधिक वाढला असून आर्द्रतेमुळे होणारी काहिली, सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड अशी अवस्था ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात अनुभवायला मिळत आहेत. मुंबईमध्ये किंचित कमी तापमान असूनही ताप मात्र अधिक जाणवत होता. मुंबईत सांताक्रूझ येथे कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक होते. हे तापमान …

Read More »

शाकाहारी पदार्थ खाण्याचे ४ आश्चर्यकारक फायदे; चला जाणून घ्या तुम्हाला माहिये का ? शाकाहारी पदार्थ खाण्याचे फायदे

जागतिक शाकाहारी दिवस दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी आपण साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना शाकाहारी पदार्थांच्या फायद्यांची जाणीव करून देणे तसेच जेवणात शाकाहारी पढार्थाचा जास्तीत जास्त वापर करणे हा त्यामागचा उद्देश,उत्तम आरोग्यासाठी शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. सामान्यतः लोकांना असे वाटते की मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारी अन्न …

Read More »

रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी करा ‘हे’ ४ नैसर्गिक उपाय रक्तदाब कसे नियंत्रित करावे वाचा सविस्तर वृत्त

उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल खूप सामान्य झाली असून शंभरातील प्रत्येकी दहा व्यक्तीला हा आजार असतो. उच्च रक्तदाबाचे कारण म्हणजे खराब जीवनशैली, तणाव या चुकीच्या सवयींमुळे विकसित होतो. उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढतो, ज्यामुळे कालांतराने हृदयाला हानी पोहोचते तसेच शरीराच्या इतर अवयवांना सुद्धा धोका पोहचतो. …

Read More »

मृत्यू कसा आणि कधी झाला याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणाऱ्या डॉक्टर सारा हिनावी न्यायवैद्यक शास्त्राकडे मुलींनी मागे न पडत करियर म्हणून पाहावे; डॉ. सारा हिनावी यांचा सल्ला

  अनेकदा आपल्याला रस्त्यावर किंवा निर्जल स्थाळी बेवारस मृतदेह सापडतात अशा मृतदेहाची कधी-कधी ओळख पटवणे पोलिसांसह फॉरेन्सिकचे टीमला सुद्धा कठीण जाते मात्र यावर संशोधन करणाऱ्या डॉ सारा हिनावी यांनी यावर संशोधन करून मृतदेहाची ओळख पटण्यासंदर्भातील प्रक्रियेवर संशोधन करून आपल्या संशोधनाचा जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे. सध्या कूपर रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र …

Read More »

आम्ही एका बाळाला मारण्याची परवानगी देऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती २६ आठवड्यांवरील गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एका महिलेला २६ महिन्यावरील गर्भधारणा संपुष्ठात आणण्याची देण्यात येणारी परवानगी नाकारली असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकालाचा दाखला दिला आहे. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य सरकार बाळाच्या जन्मानंतर त्या बाळाची पूर्ण काळजी घेऊ शकते. २६ आठवड्यांवरील गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी एम्सला निर्देश देण्याची परवानगी मागणाऱ्या …

Read More »

केवळ या महिलांनाच मिळणार मातृ वंदना योजनेचा लाभ, जाणून घ्या अटी सुरक्षित मातृत्वासाठी ‘मातृ वंदना योजना 2.0’

दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गर्भारपणाच्‍या शेवटच्‍या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता व बालकांच्‍या आरोग्‍यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मृत्‍यू दरात वाढ झाल्‍याने ते नियंत्रित करण्‍यासाठी १ जानेवारी २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना कार्यान्वित करण्‍यात आली आहे. या योजनेची …

Read More »

नव्याने लागू झालेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 नेमकी काय आहे? राज्यात लागू-मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची माहिती

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३-२४ पासून राज्यात लागू करण्‍यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्‍याच्‍या सहभागाने राबविण्‍यात येणार आहे. योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्व-निधीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत …

Read More »

अखेर औषधी व यंत्रसामुग्री खरेदी प्राधिकरणाला मिळाला सीईओ लहू माळी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर शासकिय रूग्णालयातील रूग्णांच्या पुरेशा औषधामुळे मृत्यू झाल्यानंतर अखेर राज्य सरकारने औषधी आणि सामुग्री प्राधिकरणाच्या सीईओ पदी एका सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. तब्बल चार महिन्यानंतर या प्राधिकरणाच्या सीईओ पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सनदी अधिकारी लहू माळी यांची नियुक्ती केली असून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका …

Read More »

जास्त साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो का? जाणून घ्या सत्य ! डायबिटीस होण्याची काय आहे कारण ? घ्या जाणून

  मुंबई : आज अनेक जण आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात तर दुसरीकडे काही जण आपल्या आहारात चुकीच्या पदार्थाचा समावेश करतात व काहीजण अनेक पदार्थाचा गैरसमज करून घेतात. आज या लेखाद्वारे आम्ही आपणांस चार गोष्टी सांगणार आहोत ज्या केवळ गैरसमज आहे व त्यात कसलीही सत्यता …

Read More »

टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंना आली जाग, आरोग्य यंत्रणेचे व्हिजन २०३५ जाहिर ३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश

राज्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय रूग्णालयात नुकत्याच झालेल्या रूग्णांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड सर्वचस्तरातून उठविण्यात येत आहे. तसेच विविध राजकिय पक्षांकडूनही टीका सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य यंत्रणेच्या कायापालटाबाबत व्हिजन २०३५ जाहिर केले. राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने …

Read More »