देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी आज संवाद साधला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. …
Read More »वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा सुरु करा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचे आदेश
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयांमध्ये एमआरआय व सिटी स्कॅन सेवा कार्यान्वित आहेत. मात्र, वाढती रुग्ण संख्या असल्याने त्याकरिता प्रतिक्षायादी आहे. त्यामुळे या रुग्णालयात अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा निर्माण करुन तात्काळ एमआरआय व सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करुन देण्याच्या तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना …
Read More »जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात आजपासून ‘सुंदर माझा दवाखाना’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा
राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून राज्यात आठवडाभर ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम सुरू होत असून सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यानिमित्ताने …
Read More »देशभरात ‘या’ तारखेला होणार कोविड मॉक ड्रिल १० आणि ११ एप्रिलला प्रत्येक सरकारी रुग्णालयांमधील व्यवस्थेची पाहणी होणार
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोविडचा नवा व्हेरिएंट असलेल्या एच१एन१ विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर गत कोविड काळातील परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ नये याची तपासणी करण्याच्या उद्देशाने सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील यंत्रणा कितपत सज्ज आहे याची पाहणी करण्यासाठी येत्या १० आणि ११ एप्रिल रोजी देशव्यापी कोविड मॉक …
Read More »गिरीश महाजन यांची स्पष्टोक्ती, कोरोना काळात मागे पडलेले अभियान पुन्हा सुरु राज्यात अवयवदान जनजागृती अभियान
महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना राबविली होती. त्यावेळी अवयव …
Read More »आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी दिला इन्फ्लूएंझाबाबत ‘हा’ इशारा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा दक्ष
राज्यात सध्या एच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढल्याचे व रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, याबाबत आरोग्याच्या सर्व संस्थांना सर्वेक्षण वाढविण्याच्या आणि उपचाराबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती, आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. …
Read More »गिरीष महाजन म्हणाले, कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करणे शक्य नाही निवासी वैद्यकीय अधिकारी कंत्राटावरच राहणार
मुंबई व महाराष्ट्रात १०६ निवासी वैद्यकीय अधिकारी अजूनही कंत्राटावर असून त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातील अनेक अधिकारी हे दहा वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत आहेत. १६ वर्षे सेवा होऊनही या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २०१० मध्ये पुन्हा मुलाखती घेतल्या गेल्या. मात्र अद्याप त्यांना कायम करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची …
Read More »कोविड काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आश्वासन
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेतील समायोजन कसे करता येईल याबाबतचा एक अभ्यासगट ३१ मार्चपूर्वी तयार करण्यात येईल. या अभ्यासगटाने दिलेल्या अहवालानंतर याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. विधानसभा सदस्य प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश, इन्फ्लूएंझाग्रस्त रूग्णावर तातडीने उपचार करा वेळीच उपचार सुरु करण्याबाबत जनजागृती करावी
इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फ्लूएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजाराविषयीची आढावा …
Read More »आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा, म.फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन वाढविली-विधानसभेत
महाराष्ट्रात २ जुलै २०१२ पासून राबविण्यात येणारी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या …
Read More »
Marathi e-Batmya