आरोग्य

कोरोना चाचणी करायचीय? थांबा आता फिरती चाचणी गाडी येतेय संपूर्ण राज्यात कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा- मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण होत असले तरी भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध  करून  देण्यात येईल असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले. या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त  ३ हजार …

Read More »

खुशखबरः शासकिय आणि खाजगी सेवेतील परिचारिकांना मिळणार समान वेतन कार्यवाही सुरु करावी-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोविडकाळात देशासह राज्यामध्ये वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांनी दिलेले योगदान महत्वाचे होते. त्यावरून त्यांचे महत्व दिसून आले आहे. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज …

Read More »

राज्यात ५ लाखाहून अधिक व्यक्तींना लस: ३ ऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना ३ऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी १ मार्चपासून नोंदणीची शक्यता- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु असून ६५२ केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण ५ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे १ मार्चपासून होऊ शकते, असे …

Read More »

कोरोना: अन्य राज्यांच्या तुलनेत रुग्ण संख्या, मृत्यू दर, सक्रीय रुग्ण राज्यात कमी २ हजार ६७३ नवे बाधित, १ हजार ६२२ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राने कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी  असल्याचे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. २ फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार दर दश लक्ष …

Read More »

कोरोना : राज्यात आतापर्यत जवळपास दिड कोटी तपासण्या २ हजार ७६८ नवे बाधित, १ हजार ७३९ बरे झाले तर २५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील १० महिन्यात जवळपास १ कोटी ४९ लाख २८ हजार १३० नागरीकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३५ हजाराच्या खाली आली असून आजस्थितीत ३४ हजार ९३४ इतकी संख्या नोंदविली गेली आहे. मागील २४ तासात  १,७३९ …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाची लाट थोपवायचीय नियम पाळा ब्रिटन, ब्राझीलमधील कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे बेफिकीर राहू नका-मुख्यमंत्री उध्दव

मुंबई : प्रतिनिधी कोविडचे लसीकरण वेगाने सुरु आहे परंतु ब्रिटन, ब्राझीलमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्यावेळी सांगितले. ठाकरे म्हणाले की समूह प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटीमुळे) …

Read More »

कोरोना : दोन महिन्यात २ ऱ्यांदा सर्वाधिक रूग्ण घरी २ हजार ९९२ नवे बाधित, ७ हजार ३० बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन महिन्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जानेवारी महिन्यात साधारणत: १० हजार रूग्ण बरे होवून गेले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ७ हजार ३० रूग्ण घरी गेल्याने राज्यात आतापर्यत १९ लाख ४३ हजार ३३५ बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण …

Read More »

कोरोना : नागपूर, मुंबई, पुणे वगळता कोल्हापूरसह बहुतांष ठिकाणी ० मृत्यू १ हजार ९४८ नवे बाधित, ३ हजार २८९ बरे झाले तर २७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मुंबई-ठाणे, पुणे, नाशिक, अकोला, लातूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या ८ मंडळामध्ये ठाणे मंडळातील मुंबईत फक्त ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबई महानगरातील ११ महापालिका आणि जिल्ह्यामध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर कोल्हापूर मंडळातील ६ जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू झाला नाही. पुणे विभागत फक्त पुणे शहर …

Read More »

कोरोना : जाणून घ्या कोणत्या वयोगटातील सर्वाधिक बाधित रूग्ण २ हजार ५८५ नवे बाधित, १ हजार ६७० बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे रूग्ण आढळण्यास तब्बल ११ महिने झाले. या ११ महिन्यात सर्वाधिक बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३१ ते ४० वयोगटातील व्यक्तींचे असून त्यानंतर ४१ ते ५० वयोगट, २१ ते ३० वयोगटातील आणि ५१ ते ६० वयोगटातील आणि शेवटी ६१ ते ७० या वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. …

Read More »

कोरोना : रुग्ण पॉझिटीव्हीटीच्या प्रमाण टक्केवारीत घट २ हजार ६३० नवे बाधित, १ हजार ५३५ बरे झाले तर ४२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील जवळपास एक महिन्याहून अधिक काळ कोरोना बाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात सातत्याने घट होताना दिसत आहे. तसेच बरे होवून जाणाऱ्यांच्या प्रमाणातही चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी स्थिरता असल्याचे दिसून येत असल्याने पॉझिटीव्हीच्या प्रमाणात १ टक्क्याने घट झाली आहे. यापूर्वी …

Read More »