प्रकाश आबिटकर यांची माहिती, एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार

राज्यातील नवजात बालकांना वेळेवर, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच एस एन सी यू मधील उपचार अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

एनआयसीयू व बालकांवरील उपचार या विषयावर आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार बापूसाहेब पठारे, आरोग्य सेवा (प्राथमिक) संचालक डॉ .विजय कंदेवाड तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रकाश आबिटकर पुढे बोलताना म्हणाले की, यावेळी नवजात बालकांच्या उपचारासाठी उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे तसेच महानगरपालिका रुग्णालयांमधील विद्यमान परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील कोणत्याही बालकाला उपचाराअभावी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, बालकांच्या उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाशी योग्य कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना तातडीने पत्र पाठविण्याचे निर्देशही दिले.

शेवटी बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, राज्यातील बालआरोग्य सेवा अधिक सक्षम, प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबविण्यात येतील, असा विश्वासही व्यक्त केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पैसे नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निधी, हजारो रुग्णांनी घेतला 'महाआरोग्य शिबिरा'चा लाभ

आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *