ओमायक्रोन विषाणूः आज मुंबईत दोन रूग्ण, संख्या १० वर जोहान्सपबर्ग येथे जावून आलेल्या दोघांना कोरोना

मराठी ई-बातम्या टीम
डोंबिवलीत ओमायक्रोनचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर काल लगेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ७ रूग्ण आढळून आले. तर आज मुंबईतील दोघांना या विषाणूची लागण झाल्याचा अहवाल हाती आला. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोन रूग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे.
गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग येथून मुंबईत आलेल्या ३७ वर्षिय व्यक्तीला ओमायक्रोनची लागण झाल्याचा अहवाल आला. तसेच या रूग्णासोबत २५ नोव्हेंबर रोजीच अमेरिकेहून आलेल्या त्याच्या ३६ वर्षिय मैत्रीणीला देखील ओमायक्रोनची लागण झाल्याचे राहीले आहेत. मात्र या दोघांना कोणत्याही स्वरूपाची लक्षणं नाहीत. तसेच या दोघांवर सेव्हन हिल्स येथील रूग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
या दोघांनी फायझर या कंपनीचे लसीचे डोस घेतलेले होते. या दोघांच्या संपर्कात ५ अतिजोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या निकटवासियांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्यासंदर्भातील माहितीचा तपास सुरु आहे.
डोंबिवलीत ओमायक्रोनचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर या रूग्णाला कोणतीही लक्षणे नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पुणे आणि पिंपरी येथे सापडलेल्या ७ रूग्णांनापैकी तीघांना सौम्य तर इतरांना लक्षणं नसल्याचे आढळून आले. त्यानंतर आज मुंबईत आढळून आलेल्या दोन विषाणूग्रस्तांनाही फारशी लक्षणे नसल्याचे आढळून आले. परंतु या रूग्णांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सध्या तरी दिसून येत असले तरी अशा रूग्णांमध्ये लक्षणं दिसून येत नाही. त्यामुळे या रूग्णांच्या संख्येत एकाबाजूला वाढ होताना दिसत आहे. तर दुसऱ्याबाजूला लक्षण दिसत नसल्याने चिंता करायची की नाही अशी संभ्रमावस्था जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर प्रशिक्षण धोरणात आमुलाग्र बदलाने कौशल्यवृद्धीला चालना

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *