अक्षय शिंदे एनकाऊंटर: न्यायालयाचे आदेश, १८ नोंव्हेबर पर्यंत चौकशी अहवाल सादर करा उच्च न्यायालयाचा अहवाल- वाहनाची फॉरेन्सिक तपासणी केली का

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी केलेल्या एनकांऊटरची दंडाधिकाऱ्यामार्फत जलद चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज गुरुवारी दिले. तसेच त्यासंदर्भातील अहवाल १८ नोव्हेंबर रोजी पर्यंत सादर कऱम्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती-मोहिते-डेरे आणि न्यायाधीश पी के चव्हाण यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने पोलिसांना आज दिले.

न्यायालयाने पुढे असेही सांगितले की, न्यायदंडाधिकारी चौकशीच्या अहवालाची प्रतीक्षा करू आणि त्यानंतर अक्षय शिंदे याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आदेश देऊ, असे यावेळी स्पष्ट केले.

न्यायालयाने आपल्या निकालात सांगितले की, कायद्याची गरज आहे की जेव्हा कोठडीत मृत्यू होतो तेव्हा तपास दंडाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. तपास होऊ द्या. आम्ही दंडाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा करू, असेही यावेळी सांगितले.

शिंदे यांना गेल्या महिन्यात ठाणे पोलिसांनी चकमकीत ठार मारले होते. त्याच्या वडिलांनी कथित बनावट चकमकीचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) मार्फत करण्यात यावा अशी चौकशीची मागणी याचिकेमार्फत उच्च न्यायालयात केली. त्यावरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले.

मागील सुनावणीत, न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला गोळ्या घालण्याच्या पद्धतीसह आणि एका व्यक्तीवर चार पोलीस अधिकारी कसे काय नियंत्रित करू शकत नाहीत यासह अनेक प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी सादर केलेल्या माहितीबाबतही शंका उपस्थितीत न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले.

ऑगस्टमध्ये बदलापूर येथील एका शाळेत २३ वर्षीय शिंदे याने बालवाडीच्या दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. २३ सप्टेंबर रोजी शिंदे यांना त्यांच्या पत्नीने नोंदवलेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात तळोजा कारागृहातून पुन्हा ताब्यात घेण्यात आले. त्याला ठाण्याकडे नेत असताना, त्याने एका हवालदाराकडून बंदूक हिसकावून घेतली आणि दुसऱ्या एका हवालदारावर गोळी झाडून जखमी केले. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव वाहनातील दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याने गोळी झाडली असता अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सुरुवातीलाच मागील सुनावणीपासून तपासाच्या प्रगतीबाबत विचारणा केली. ॲडव्होकेट जनरल डॉ बिरेंद्र सराफ यांनी उत्तर देताना सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आले आहे.

त्यानंतर ज्या वाहनात ही घटना घडली त्या वाहनाची फॉरेन्सिक तज्ज्ञाने तपासणी केली होती का, अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच पोलिस कर्मचाऱ्याला बंदुकीच्या गोळीने झालेल्या दुखापतीच्या आजूबाजूच्या परिस्थितीचाही तपास करावा लागेल असे निरीक्षण नोंदवले आहे.
शिवाय, न्यायालयाने याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांना मीडियाशी बोलू नये असा सल्ला दिला.

तुम्ही जितके कमी बोलता तितके मीडियाला संबोधित करणे केव्हाही चांगले. आम्ही सर्वांना न्याय देण्यासाठी येथे आहोत, असेही यावेळी न्यायालयाने अक्षय शिंदे यांच्या वडीलांच्या वकीलांना सांगितले.

About Editor

Check Also

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारवाई

मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे आज झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *