प्रेयसीच्या आत्महत्येचा तपास नीट होत नसल्याने प्रियकराचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्याने आष्टी येथील प्रौढाचा प्रयत्न

प्रेयसीने केलेल्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून नीट होत नसल्याचे गाऱ्हाणे घेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर गेला होता. मात्र तेथे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नसल्याने अखेर या प्रियकराने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. सुदैवाने मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर जाळी बसविण्यात आल्याने सदर व्यक्तीला कोणत्याही पध्दतीची फारशी दुखापत व इजा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कर्जत येथे राहणाऱ्या प्रेयसीने आत्महत्या केली. त्याचा तपास कर्जत पोलिस स्टेशनकडून योग्य त्या पध्दतीने होत नसल्याने तक्रार घेवून सदर प्रेयसीचा प्रियकर बापू नारायण मोकाशी वय वर्षे ४३ (रा.आष्टी जिल्हा बीड) याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांशी बापू नारायण मोकाशी यास बोलतं करण्याचा प्रयत्न केला असता मोकाशी म्हणाले की, माझ्या प्रियसीवर बलात्कार झालेला आहे. त्यामुळे तीने आत्महत्या केली. यासंदर्भात उध्दव ठाकरे यांना ४ पत्रे दिली.

दरम्यान, त्याला जीटी हॉस्पीटल येथे उपचारासाठी मोकाशी यास दाखल करण्यात आल्याचेही मंत्रालयातील पोलिसांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुंबईत एका महिलेने ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या पोलिसांची व्हॅन अडवली सुरुवातीला एकटीने पोलिसांचे वाहन अडविले

पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी असलेली एक महिला, ताब्यात घेतलेल्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा मागचा दरवाजा उघडणारा एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *