संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग… उपस्थिती… विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके… यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. दरम्यान आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करून दाखवला आहे. देशाचे सर्वोच्च सभागृह …
Read More »येत्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआयमधील विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे, त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन (स्टायफंड) देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री …
Read More »जलद न्यायासाठी पर्यायांचा स्वीकार गरजेचा राज्यस्तरीय वकिल परिषदेत न्यायमूर्ती भूषण गवई यांचे मत
न्यायव्यवस्थेवरील वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणाऱ्या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक काळातील साधणे, तंत्रज्ञानाचा स्वीकार करून काम करणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषदेच्यावतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश,… तर मुंबईतील विकासकांवर कारवाई करा दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या ५६ प्रकल्पांसाठी नोडल अधिकारी नियुक्त
मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध पर्याय तपासण्यात यावे. प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना …
Read More »ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना शिंदे सरकारच्या समितीतून वगळले जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी पशु व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविले पत्र
आरेच्या सर्वांकष विकासाबरोबर आरेतील आदिवासी व बिगर आदिवासी रहिवाशांना मुलभूत सुविधा देण्यासाठी सातत्याने दिवस-रात्र प्रयत्न करणारे तसेच वेळोवेळी लोकशाहीच्या विविध आयुधांचा वापर करुन विधानसभेत आरेतील विविध प्रश्न मांडणारे ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीतून वगळण्यात आल्याने विधानसभा क्षेत्रातआश्चर्य व्यक्त करण्यात येत असून आरेतील रहिवाशांमध्ये असंतोष …
Read More »कल्याण-डोंबिवली मनपात समाविष्ट २७ गावांतील मालमत्ता कर, बांधकांमांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश विविध शिष्टमंडळांनी आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे सादर केले
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ता करांबाबत, गावठाण व त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत सर्व्हेक्षण करा. आवश्यकतेनुसार समिती स्थापन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या २७ गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीने आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी श्री संत सावळाराम महाराज …
Read More »राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत ६ मे ते ६ जून २०२३ या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष आता …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, मरीन ड्राईव्हला पर्यटकांसाठी सी साईड प्लाझा आणि लेझर शो… प्रसाधनगृह, आसन व्यवस्था, स्वच्छता, सुशोभीकरण यासाठी मुंबई महानगरपालिका करणार उपाययोजना
देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले. मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छता …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ई- शिवनेरीचा शुमारंभ पण, १०० बसेस धावणार मुंबई ते… आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात बसस्थानके ही होणार स्वच्छ, सुंदर
एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या …
Read More »राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी स्वीकारला पदभार मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून स्विकारला सुत्रे
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, …
Read More »
Marathi e-Batmya