मुंबई

या तीन महानगरपालिकांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि फरकही मिळणार ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि बदलापूर नगरपालिकेला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पुणे : प्रतिनिधी ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बदलापूर नगरपालिका या यामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करणे व  किमान वेतनाचा फरक देण्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने दुरदृश्य प्रणालीद्वारे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली.  यामध्ये डॉ.गोऱ्हे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून त्यांचा फरकही तात्काळ देण्यात यावा. तसेच सामाजिक …

Read More »

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाकरिता विकासकांसाठी आता नवीन मार्गदर्शक सूचना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासाकरिता 11 सप्टेंबर 2019 चा शासन निर्णय रद्द करून नवीन मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल. 1. विकासक नोंदणी व विकासक पात्रतेसंदर्भातील नवीन मार्गदर्शक सुचना (guidelines) /निकष …

Read More »

या कारणामुळे अखेर धारावीची निविदा रद्द राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील २० वर्षापासून रखडलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास आणखी रखडणार असून फडणवीस सरकारच्या काळात ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या सुरु झालेल्या हालचाली अखेर आज पूर्ण होत राज्य मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले. आता धारावीसाठी पुन्हा नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात धारावीसाठी दुबईशी संबधित सेखलिंक या …

Read More »

लोकल सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर रेल्वेने दिले हे उत्तर सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबतच्या योजनेवर काम सुरु

मुंबई : प्रतिनिधी शहर आणि उपनगरात लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याच्या अनुषंगाने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीकोनातून राज्य सरकारने पाठविलेल्या पत्रावर आम्ही करत असल्याची माहिती मध्य रेल्वेने एका ट्विटच्या माध्यमातून ट्विटरवर दिले. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यात प्रवाशांमध्ये शाररीक अंतर पाळले जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून योजना करणे आवश्यक …

Read More »

राज्य सरकारचा प्रस्ताव….पण रेल्वेने मंजूरी दिल्यास सर्वांसाठी लोकल सुरु मदत व पुर्नवसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांचे पत्र

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहर व उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे उपनगरीय गाड्या कधी सुरू होणार याबाबत सातत्याने विचारणा करण्यात येत होती. तसेच कधी एकदा लोकल गाडी सुरू होते अशी अवस्था झाली होती. यावर आता लोकल रेल्वे सर्वच नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सर्वांनाच लोकलने प्रवास …

Read More »

ठाकरे सरकारमधील हे मंत्री म्हणाले की, लोकल सगळ्यांसाठी लवकरच सुरू होणार दोन-तीन दिवसात निर्णय होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील सर्वसामान्य चाकरमान्यांना आता लोकलसाठी फारकाळ वाट पहावी लागणार नसून आगामी दोन-तीन दिवसात यासंदर्भात निर्णय होणार असल्याची आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालयांचे वेळापत्रक आणि लोकांच्या कामाच्या वेळा याची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. हॉटेल इंडस्ट्री लवकर सुरु होते. …

Read More »

अखेर महिलांना लोकल प्रवास करण्यास रेल्वेमंत्र्यांनी दिली मान्यता पियुष गोयल यांची ट्विटरवरून मान्यता

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरातील चाकरमानी असलेल्या महिलांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर त्यावर रेल्वे विभागाने रेल्वे बोर्डाच्या मान्यतेचा प्रश्न पुढे करत महिलांना प्रवास करण्यास परवानगी नाकारली होती. अखेर त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आपली चुप्पी तोडत लोकल रेल्वेने प्रवास करण्यास मान्यता देण्याचे आज जाहीर करत महिलांना उद्यापासून …

Read More »

मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर सेवा सुरू करावी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली. राज्य सरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने नियमित सेवा सुरू …

Read More »

महिला प्रवाशांना परवानगी द्या, रेल्वे म्हणते रेल्वे बोर्डाची मंजूरी मिळाल्यावर राज्य सरकारला पत्र पाठवत दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरात राहत असलेल्या चाकरमानी महिलांना नवरात्रोत्सावाच्या पहिल्या दिवसापासून रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वे विभागाला पाठविले. त्यावर तातडीने पश्चिम रेल्वेने त्यावर उत्तर देत राज्य सरकारच्या विनंतीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असून बोर्डाची परवानगी मिळाल्यानंतर सर्वसाधारण महिलांना प्रवासास परवानगी देता येणे शक्य …

Read More »

चाकरमानी महिलांसाठी खुषखबर ! उद्यापासून लोकलने प्रवास करता येणार परंतु ठराविक कालावधीतच, राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी मागील सात महिन्यापासून राज्य सरकारने परवानगी दिलेल्यांनाच मुंबई उपनगरात लोकलने प्रवास करता येत होता. मात्र आता या परवानगी असलेल्यांबरोबरच सर्वसाधारण महिला चाकरमानींनाही उद्यापासून अर्थात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून लोकलने प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी त्या कालावधीतच प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सकाळी ११ वाजल्यापासून …

Read More »