मुंबई

ठाणे शहरासाठी खास २९ किमीची रिंगरूट मेट्रो मेट्रो रेल्वे प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई : प्रतिनिधी ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्यातील दाट वस्तीच्या भागातील वाहतुकीची समस्या यामुळे सुटण्यास मदत होईल. ठाणे शहर व परिसरातील वाहतुकीची वाढती गरज भागविण्यासाठी कॉम्प्रिहेन्सीव्ह मोबिलिटी प्लान तयार करण्यात आला आहे. …

Read More »

१५ डब्याची लोकल आता डोंबवलीकरांनाही मिळाली डोंबिवली ते सीएसटीएम दोनवेळा तर कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या फेऱ्या वाढविल्या

मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगरातील मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटीएम ते कल्याण १५ डब्याच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करत डोंबिवलीकर प्रवाशांच्या सेवेसाठी आजपासून १५ डब्यांच्या लोकल दाखल होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली या मार्गावर १५ डब्यांच्या स्वतंत्र दोन लोकल फेऱ्या सुरू होत आहेत. मध्य रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या दुसरा …

Read More »

पोलिसांचे भावविश्व, संवेदना समाजासमोर याव्यात गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच त्यांच्यातील भावविश्व व संवेदना समाजासमोर याव्यात. त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच समाजातील घटकांशी सुसंवाद घडवून समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने पोलिसांचे हे पहिलेच साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर यांनी आज येथे केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे …

Read More »

पुलवामा घटनेचा सोशल मिडीयासह सर्वस्तरात निषेध

नालासोपारा, घाटकोपर, ठाणेसह अनेक ठिकाणी मोर्चे, रेल रोको, निदर्शने  मुंबंईः प्रतिनिधी जम्मू व काश्मीर येथील पुलवामा येथे जैश ए-मुहम्मद या अतिरेकी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाच्या ४४ सैनिकांना प्राण गमावावे लागले. त्याचे पडसाद राजकिय क्षेत्राबरोबरच सर्वसामान्य नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमटले असून सोशल मिडीयावरील व्हॉट्सअँप, फेसबुक, ट्टिटरवर पाकिस्तान निषेधाच्या पोस्ट झळकत …

Read More »

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्र सायबरचा गौरव

डॉक्युमेंट मँनेजमेंट विभागातील दोन पुरस्काराने सन्मानित मुंबई : प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल महाराष्ट्र पोलीसांच्या महाराष्ट्र सायबर प्रकल्पाला देशपातळीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले असून कोची येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या समारंभात काल हे पुरस्कार महाराष्ट्र सायबरला प्रदान करण्यात आले. कोची येथे झालेल्या द ओपन …

Read More »

उदय देशपांडे यांना जीवनगौरव तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर

राज्यपालांच्या हस्ते होणार वितरण मुंबई : प्रतिनिधी  राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १७ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विदयासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. …

Read More »

राष्ट्रवादीच्यावतीने आता ‘जॉब दो’ आंदोलन

कार्यकर्त्यांनी मोदी सरकारकडे जॉब मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन   मुंबई: प्रतिनिधी जॉब दो… जॉब दो मोदी सरकार जवाब दो… राष्ट्रवादीची एकच पुकार जॉब दो… ये आझादी झुठी है… ये सरकार बदलनी है…मोदी सरकार हाय हाय…युवाओ को जो काम न दे वो सरकार बदलनी है… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…अशा गगनभेदी घोषणा …

Read More »

गोवा फेस्टीवल २०१९ चा आनंद आता खारमध्ये

९ व १० फेब्रुवारी दोन दिवस आयोजन मुंबई : प्रतिनिधी सालाबादप्रमाणे यंदाही नवव्या गोवा फेस्टीवलचे आयोजन खार जिमखाना येथे ९ व १० फेब्रुवारी २०१९ असे दोन दिवस होणार आहे. गोव्यातील अतुल्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होऊन येथील रोजगार निर्मितीसाठी आणि येथे उत्पादन होणाऱ्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हवी या हेतूने …

Read More »

अखेर म्हाडाच्या संक्रमण श‍िब‍िरातील २१ हजार रह‍िवाशांच्या पुर्नवसनाचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे शक्यतो त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. संक्रमण शिबिरांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे किंवा सुरु होणार आहे अशाच ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील …

Read More »

महापालिका रूग्णालयातील आरोग्य सेविकांचे मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन

४००० हजार सेविकांचे आंदोलन  मुंबई : प्रतिनिधी  मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रूग्णालयातील आरोग्य सेविकांना किमान वेतन कायदा लागू करावा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी गेले दोन  दिवस संपावर असलेल्या आरोग्य सेविकांनी आज बुधवारी थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारच्या विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात तब्बल ४००० …

Read More »