डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे ५ लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. कळंबोली, नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन …
Read More »मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिक आता महारेराच्या अध्यक्ष पदी अजोय मेहता यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सौनिक यांची नियुक्ती
राज्याचे माजी मुख्य सचिव तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सल्लागार मनोज सौनिक यांची महारेराच्या अध्यक्ष पदी आज नियुक्ती करण्यात आली. महारेराचे माजी अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागेवर आता मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक हे जेष्ठ सनदी अधिकारी असून …
Read More »डोंबिवलीच्या बसला पनवेल जवळ अपघातः मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली भेट मध्यरात्री बस आणि ट्रॅक्टरचा झाला होता अपघात अनेकांचे प्राण वाचले
यशवंतराव चव्हाण महामार्गावरील पनवेल नजीक दरम्यान डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या एका बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक लागून अपघात झाला. मात्र या अपघातात बस रस्त्यावरून काहीशी खोलगट असलेल्या भागात पडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून ५ ते ६ जण गंबीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली ४५ जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात …
Read More »उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात, कोणाचे हिंदुत्व खरे हे समजून घ्यावे लागेल?
मुंबई – हिंदुस्थान आणि हिंदुत्वाचा चेहरा, अवघ्या हिंदुस्थानचे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. जोपर्यंत ते मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही अशी प्रतिक्रिया शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे शत्रुत्व नाही, मी त्यांच्या हिताबद्दलच बोलत …
Read More »रामदास आठवले म्हणाले, व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज अधिकाधिक रोजगार निर्माण करणार - मंत्री मंगलप्रभात लोढा
कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण …
Read More »पावसामुळे ठाणे, पालघर, रायगडमधील नद्या पोहचल्या इशारा पातळीवर १४ नद्या दुथडी भरून वाहू लागल्या
मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई, उपनगरासह पालघर आणि रायगड जिल्ह्यात सातत्याने जोराचा मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने या तिन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळीवरून वाहू लागल्या असल्याने जलसंपदा विभाग आणि हवामान खात्याने नागरिकांना धोक्याचा इशारा दिला. वास्तविक पाहता मुंबई, उपनगर, पालघर आणि रायगड जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा दावा, देशात ३ ते ४ वर्षात आठ कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या नेस्कोच्या मैदानावर आयोजित पंतप्रधान मोदीचे वक्तव्य
रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या ३ ते ४ वर्षात भारतात आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत आणि या आकडेवारीने नोकऱ्यांबद्दल खोटे कथा पसरवणाऱ्यांचे दावे उघडे पडले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी करत कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि आमचे सरकार या दिशेने …
Read More »वंचितचा सवाल, जयभीम नगरातील ७०० कुटुंबे रस्त्यावर आली जबाबदार कोण? नदी, नाले, सफाईवर किती कोटी खर्च केला?
दोन आठवड्यापासून मुंबईमध्ये होणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. मुंबई महानगरपालिकेचे एकूण बजेट २०२४-२५ वर्षासाठी ६०,००० कोटींचे आहे. जे एखाद्या छोट्या राज्यापेक्षाही जास्त आहे. इथे पावसाळ्याच्या अगोदर होणारे मुख्य काम म्हणजे नालेसफाई, नदी सफाई आहे. यावर किती खर्च झाला आहे? आजच्या मुंबईच्या या अवस्थेला मुंबई महापालिका जबाबदार आहे, असा आरोप …
Read More »वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क स्थगित आरटीओची प्रसिध्दी पत्रकान्वये माहिती
परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिवस ५० रुपये विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घेत आपापली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन परिवहन आयुक्त …
Read More »मुकेश अंबानी सहित ५ थकबाकीदाराने एमएमआरडीएचे थकविले ५,८१८ कोटी आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती
जगात श्रीमंतीत ११ व्या स्थानी आणि भारतात प्रथम असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एमएमआरडीएचे ४३८१ कोटी थकविले आहेत. अंबानी सहित अन्य ५ थकबाकीदार आहेत त्यांची एकूण थकबाकी ५,८१८ कोटी असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे थकबाकीदार यांना दिलेली …
Read More »
Marathi e-Batmya