मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई, उपनगरासह पालघर आणि रायगड जिल्ह्यात सातत्याने जोराचा मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने या तिन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळीवरून वाहू लागल्या असल्याने जलसंपदा विभाग आणि हवामान खात्याने नागरिकांना धोक्याचा इशारा दिला.
वास्तविक पाहता मुंबई, उपनगर, पालघर आणि रायगड जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना एकप्रकारे पुर आला आहे. तसेच सखल भागात पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली. त्यामुळे आज रविवारचा दिवस असल्याने अनेक नागरिकांनी घरी राहणेच पसंत केले. मात्र सखल भागात पाणी साचल्यामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाल्याचे दृष्य पाह्यला मिळाले.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, मोहने, जांभूळपाडा या भागातून जाणारी उल्हास नदी दुथडी भरून वहात आहे. तर टिटवाळा मधून जाणारी काळू नदी, सापगावची भातसा नदीही पावसामुळे भरून वहात आहे. या भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या भातसा धरणातूनच मुंबईला पाणी पुरवठा होत असतो.
तसेच पालघर मधील वैतरणा, पिंजाळ, सुर्या या नद्या अनुक्रमे वाडा, पाली, मासवण या भागातून वाहत आहेत. या नद्यांच्या परिसरातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने या नद्यांना पाणी आले आहे. मात्र या नद्यांनी अद्याप धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी या नद्यांच्या आजूबाजूच्या परिसरात काही प्रमाणात पाणी घुसले असल्याचे दिसून येत आहे.
तर रायगड जिल्ह्यातून महाडलमधून वाहणारी सावित्री नदी, नागोठाणे मधून वाहणारी अंबा नदी, डोलवहालमधून जाणारी कुंडलिका, लोहपमधील पाताळगंगा, कर्जतमधून जाणारी उल्हास, पनवेलमधून जाणारी गाढी नदी आदींना मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. या नद्यांच्या महाड, सुधागड, कोलाड, खालापूर, कर्जत, पनवेल आदी भागात आज काळपासून १०१ ते १५५ मिलीलिटर पाऊस पडल्याने या नद्यां दुथडीभरून वहात आहेत. यापैकी कोलाड आणि कर्जतमधून वाहणाऱ्या नद्यांनी धोक्याच्या पातळीवरून वहात आहेत.
या नद्यांना आलेल्या पाण्यामुळे मुंबई आणि उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव-धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. परंतु सध्या मुंबई आणि उपनगरात सरासरी पावसाचे जे प्रमाण असते त्या प्रमाणात मध्यंतरी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम मान्सूनच्या पावसाकडून होत आहे.
नदी पात्रांमधील पाण्याची पातळी आणि आजच्या पाऊसाची स्थितीची माहिती देणारे पत्रकः

Marathi e-Batmya