दादर येथे भाजपा कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन भाजप कार्यालयासमोर फुले उधळून राहुल गांधींना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा केला निषेध

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दादर येथील वसंत स्मृती या भाजपा कार्यालयासमोर पोलिसांच्या दडपशाहीला झुगारून प्रचंड घोषणाबाजी करत भाजपाच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी युवक कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणा-यांचा भाजपा कार्यालयासमोर फुले उधळून निषेध केला.

आज सायंकाळच्या सुमारास मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस आंदोलन करणार असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. पोलिसांची दडपशाही मोडून काढत झीनत शबरीन यांच्या नेतत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयसमोर पोहोचून तीव्र घोषणाबाजी केली आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या प्रकाराचा भाजपाच्या कार्यालयासमोर फुले उधळून अनोख्या पद्धतीने निषेध केला. पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन भोईवाडा पोलीस स्थानकात नेले.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, आंदोलनादरम्यान आम्ही भाजपा कार्यालयासमोर प्रतीकात्मक फुलांचा वर्षाव करून “द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाला महाराष्ट्रात स्थान नाही,” असा स्पष्ट संदेश दिला. लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र हिंसेच्या धमक्या देणे हे लोकशाहीच्या मूल्यांवर आघात आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे. युवक काँग्रेस लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने लढा देत राहील.”

पोलीस भाजपा कार्यकर्त्यांना आंदोलन करायला मोकळी सूट देतात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही करतात. आंदोलन करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतात, घरातून पोलीस घेऊन जातात. पण राहुल गांधी विरोधात भाजप जेव्हा आंदोलन करते तेव्हा पोलीस गायब असतात. पोलिसांनी युवक काँग्रेसवर दडपशाही करण्यापेक्षा राहुल गांधींना गोळ्या घालून जीवे मारण्याच्या धमक्या देणा-यांवर कारवाई केली पाहिजे असे शबरीन म्हणाल्या.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अशोक नगरमधील डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेले मृत्यू ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी कुर्ला पश्चिम आणि घाटकोपर पश्चिममधील धोकादायक भागांचे ऑडिट करून संरक्षक भिंत बांधण्याची मागणी एप्रिलमध्ये करूनही बीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

कुर्ला पश्चिमेतील अशोकनगर येथे डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *