दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भेटीसाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षातील नेत्यांना दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने वांद्रे रिक्लेमेशन येथे रात्री रास्ता रोको आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने …
Read More »दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील निदर्शनात ११०० जणांना पोलिसांकडून स्थानबद्ध विरोधी पक्ष आणि युवा विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन
डावे पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांचे शेकडो आंदोलक, विद्यार्थी आणि युवा संघटनांसह, शुक्रवारी दिल्लीच्या जंतर मंतरवर जमले. मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) मधील कथित अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी त्यांनी पोलिसांचे निर्बंध आणि बॅरिकेड्स झुगारले. …
Read More »उदय भानू चिब यांची मागणी, IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्रा. सुर्यनारायण दुल्लांना तत्काळ अटक करा राहुल गांधी यांचा साहिलच्या पालकांशी फोनवरून संवाद, काँग्रेस साहिलच्या कुटुंबियांसोबत, साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल.
आयआयटी IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याला संस्थेतील प्राध्यापकांनी जातीवाचक व मानसिक छळ केल्यामुळेच आत्महत्या करावी लागली. साहिलवर बिनबुडाचे आरोप करण्यात आले, यातूनच साहिलला टोकाचे पाऊल उचलावे लागले. साहिलच्या आत्महत्येस प्रा. सत्यनारायण दुल्ला हेच जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी व सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे …
Read More »झीनत शबरीन यांची मागणी, नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरोधातील एफआयआर मागे घ्या रिया यादव व मुस्कान कन्नौजियाला धमकी देण्याऱ्यांवर कारवाई करा
‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर या तरुणीला सोशल मीडियावर सतत धमक्या मिळत आहेत. पोलिसांकडे तक्रार करूनही धमक्या कमी झालेल्या नाहीत. सरकारविरोधात आवाज उठल्यामुळे रियाला प्रचंड त्रास दिला जात आहे. रियाला धमकी देणाऱ्यांना अटक करावी व आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे गुन्हे …
Read More »काँग्रेसचा आरोप, शिक्षण विभाग भ्रष्टाचाराची बजबजपुरी, भविष्य उद्ध्वस्त करून पैसे कमावण्याचा धंदा विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्याबद्दल थँक्यू मोदी अभियान आहे का? झिनत शबरीन
नीट पेपर फुटी प्रमाणेच राज्यात सीईटी व टीईटीचे पेपर फुटले आहेत, याचा ६ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. भाजपा सरकारच्या नालायकपणामुळे लाखो विद्यार्थी व पालकांना मनस्ताप झाला असून त्यांच्या स्वप्नांवर वरंवटा फिरवला आहे पण शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. येत्या ७ दिवसात शिक्षण मंत्री दादा भुसे …
Read More »राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षाकडून विविध कार्यक्रमांनी साजरा मुंबई युवक काँग्रेसकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गिग वर्कर्सना पेट्रोलचे वाटप
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षाकडून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते राहुल गांधी यांच्यावरील जनमानसाची ‘शिदोरी’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस अभिजित सपकाळ, गुरबिंदरसिंग बच्छेर, प्रदेश सरचिटणीस व शिदोरीचे प्रबंधक संपादक अनंत मोहोड, कार्यकारी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, नरेंद्र मोदींचा ना खाऊंगा, ना खाने दुंगाचा नारा पोकळ देशात १२ वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट सुरु
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. वर्षाला २ कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, १०० स्मार्ट सीटी बनवणार, विकास करणार अशा घोषणा दिल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, अशी राणाभीमदेवी थाटात गर्जना केली पण मोदी फुसका बार निघाले. १२ वर्षापासून देशात अक्षरशः लुट सुरु आहे, दोन गुजराती देश विकत आहेत …
Read More »दादर येथे भाजपा कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन भाजप कार्यालयासमोर फुले उधळून राहुल गांधींना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा केला निषेध
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दादर येथील वसंत स्मृती या भाजपा कार्यालयासमोर पोलिसांच्या दडपशाहीला झुगारून प्रचंड घोषणाबाजी करत भाजपाच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी युवक कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणा-यांचा भाजपा कार्यालयासमोर फुले उधळून निषेध …
Read More »उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन ‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा
उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर …
Read More »युवक काँग्रेसची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर धडक डॉ. संपदा मुंडेंना न्याय देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी युवक काँग्रेसने मुंबईत आज तीव्र आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर थेट धडक दिली. नरीमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह व वर्षा बंगला अशा तीन ठिकाणी युवक काँग्रेसने आंदोलन करून भाजपा महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून डॉक्टर संपदा मुंडे …
Read More »
Marathi e-Batmya