राज ठाकरे यांनी संदिप देशपांडे, अमित ठाकरेंवर सोपविली नवी जबाबदारी मनसेतील पक्षांतर्गत नव्या पदांची निर्मितीही केली जाहिर

आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नव्याने या निवडणूकीत उतरण्याची तयारी सुरु आहे. तसेच पक्ष बांधणीच्या उद्देशाने पक्षाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच पक्षात नव्याने पद निर्मित करत त्याची जबाबदारीही काही जणांवर सोपविली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईची जबाबदारी माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांच्यावर सोपवित विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या अमित ठाकरे यांच्यावरही जबाबदारी सोपविली आहे.

मनसेची आज महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिकांच्या निवडणूकींच्या अनुषंगाने पक्षाचा आढावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतला. तसेच नवीन पदांची घोषणाही केली. मनसेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मुंबईच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी संदिप देशपांडे यांच्यावर सोपविण्यात आली. तर अमित ठाकरे यांच्यावर सर्व शाखांची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी झालेल्या पक्षाच्या बैठकीत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत पक्षात विभाग अध्यक्ष हेच पद ठेवण्यात आले होते. मात्र आता नव्या पदांची निर्मिती आपण करत असून शहराध्यक्ष पद एक आणि उपशहराध्यक्ष पद तीन अशी चार पदे निर्माण केली आहेत. संदीप देशपांडे यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कुलाबा ते माहिम आणि कुलाबा ते शीव याची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच पश्चिमेकडील विभागाची जबाबदारी कुणाल माईनकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर पूर्वेकडच्या विभागाची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या चौकटीत काम करायचं याची माहिती त्यांना दिली जाईल असेही यावेळी सांगितले.

तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही केंद्रीय समितीची स्थापना केली असून ही केंद्रीय समिती प्रत्येक घटकावर लक्ष ठेवेल. या समितीत पक्षाच्या काही नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नितीन सरदेसाई यांच्याकडे विभाग अध्यक्षांची तर अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखाध्यंक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या यादीत अनेक लोक आहेत. या प्रकाराची रचना ठाणे शहरासाठीही केली आहे. ठाण्याची केंद्रीय समिती तयार करण्यात आली असून त्या समितीत अविनाथ जाधव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर अभिजीत पानसे आणि राजू पाटील हे ही काम पाहतील असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे आवाहन, पराभवाने खचून जाऊ नका, मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांबरोबर वर्षा गायकवाड यांची राजीव गांधी भवनमध्ये बैठक

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व दबावाला बळी न पडता लढा दिला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *