भाजपा खासदार डॉ अनिल बोंडे, नवनीत राणा यांच्या लव्ह जिहादचा बार फुसका मुलीनेच दिला जबाब असा कोणताही प्रकार नाही

अमरावतीतील धारणी येथील एका हिंदू मुलीला मुस्लिम तरूणाने फुस लावून पळवून लावले. तसेच त्या मुलीच्या मनात नसताना तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला. त्यापाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी तर थेट राजापेठ पोलिस ठाण्यात जात पोलिसांनाच फैलावर घेतले. मात्र आज अखेर ती पळवून नेलेल्या मुलीने दिलेल्या जबाबामुळे नवनीत राणा आणि डॉ अनिल बोंडे यांच्या दावा फुसका बार निघाला आहे.

भाजपा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी खास यासंदर्भात एक व्हिडिओ जारी करत धारणीतील २० वर्षीय हिंदू मुलीला जी बीएसएस्सी ग्रॅज्युएट झालेली आहे तीला ४ थी शिकलेल्या पालेभाज्या आणि बटाटे विकणाऱ्या मुस्लिम मुलाने पळवून नेले. तसेच तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याचा दावा केला. याशिवाय ज्या संस्थेत विवाह केला ती संस्थाच बोगस निघाली असून निकाहनाम्यावर ज्या काझीने सही केली तो काझी नसल्याचा आरोप केला.
यावरून डॉ. बोंडे यांनी थेट मुस्लिम समुदायाला लक्ष्य करत आपल्या मुलांना सांभाळा अन्यथा परिणाम वाईट होतील असा सज्जड इशाराही दिला होता. तर नवनीत राणा यांनी तर याप्रकरणी आपण पोलिस अधिकाऱ्याला केलेला फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप करत राजा पेठ पोलिसांना धारेवर धरत त्या मुलीला शोधून परत आणण्याची मागणी केली.

दरम्यान अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग यांनी आपली पथके तातडीने तपासासाठी पाठविली. त्यावेळी सदरची मुलगी ही सातारा येथे असल्याचे आढळून आले. सातारा पोलिसांच्या मदतीने त्या मुलीला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी सातारा पोलिसांना दिलेल्या जबाबात मुलीने सांगितले की, घरच्यांच्या त्रासाला कंटाळून मीच स्वतः घर सोडून आले होते. तसेच माझे घर सोडून निघून जाणे हा प्रेम प्रकरणाचा भाग नसल्याची स्पष्टोक्ती दिल्याचे पोलिस आयुक्त आरती सिंग यांनी काही वृत्त वाहीन्यांशी बोलताना सांगितले.

तसेच त्या मुलीला अमरावतीत आणण्यात येत आहे. त्या मुलीला इथे आणल्यानंतर पुढील अधिकची माहिती मिळेल असेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांचा इशारा, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रकरण लवकरच उघड भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर

भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *