‘पन्नास खोके,… ‘ घोषणेप्रकरणी राहुल शेवाळे न्यायालयात, तिघांना हजर राहण्याचे आदेश संजय राऊत, आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे यांना न्यायालयाची नोटीस

महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना पन्नास खोके एकदम ओके ही विरोधकांनी दिलेली घोषणा घराघरात पोहोचली. ठाकरे गटाच्या शिवसेनेनेकडून सातत्याने याच घोषणेच्या आधार घेत त्या अनुषंगाने पत्रकार परिषदांमधून आरोपही करण्यात आले. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या घोषणे विकत घेतलेला न्याय असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केल्याने ही एकप्रकारे मानहानी असल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर दिल्ली न्यायालयाने ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना नोटीस बजावत हजर राहण्याचे आदेश दिले.

दिल्ली उच्च न्यायालयात तीन जणांविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने तिघांना समन्स बजावत प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले.
शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी २ हजार कोटी रूपयांचा सौदा झाला होता. सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला. हा न्याय नाहीये, ही डील आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

याप्रकरणी शिवसेना ( शिंदे गट ) खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर आज २८ मार्च रोजी सुनावणी पार पडली. तेव्हा उच्च न्यायालयाने तिघांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले. यावर आता १७ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना आणखी बदनामीकारण आरोप करण्यापासून रोखण्यात यावं, अशी विनंती राहुल शेवाळे यांचे वकील राजीव नायर यांनी न्यायालयाला केली. त्यावर हे राजकीय प्रकरण आहे. प्रतिवाद्याचं मत ऐकूनच निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

About Editor

Check Also

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्य करार

महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *