अजित पवारांच्या मनात आजही फडणवीसच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर त्यावरील चर्चा सुरु करण्यासंदर्भात आज दुपारी विधानसभेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होती. त्यावेळी अजित पवार यांनी अनावधाने फडणवीस यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते असा करण्याऐवजी मुख्यमंत्री असा केला. मात्र लगेच आपली चूक लक्षात येताच स्वतःच हसून सदरच्या वक्तव्याची माफी उपमुख्यमंत्र्यांनी मागितली.

विधानसभेच्या सभागृहात आजपासून ७ दिवस अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे संकेत आहेत. मात्र करोना आणि कोविड व्हायरसच्या भीतीने अधिवेशन लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. पार्श्वभूमीवर ही चर्चा ७ दिवसाऐवजी ती ३ दिवस करण्याचा ठराव सभागृहात मांडण्यात आला. तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरु करण्यात यावी अशी विनंती केली. त्यावर अनेक आमदारांना अर्थसंकल्पावर बोलायचे असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

त्यावर चर्चेची मुदत ७ दिवसांवरून ३ दिवसांवर आल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट करत आज फक्त मुख्यमंत्र्यांचे भाषण होईल असे जाहीर केले. त्यावर आपली अनावधानाने झालेली चुक लक्षात येताच अजित पवार यांनी स्वतःच्याच विधानावर हासत सॉरी विरोधी पक्षनेते फडणवीस हे बोलतील आणि उर्वरित आमदार उद्या बोलतील असे सांगत त्यावर पडदा टाकला.

मात्र अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री केल्याने काहीकाळ सभागृहात हास्याची लकेर उमटली.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *