हवेली-वाघोलीची स्वतंत्र महानगरपालिका होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मुंबईः विशेष प्रतिनिधी

पुणे महानगरातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे त्याचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याऐवजी वाघोली-हवेली तालुक्याची मिळून स्वतंत्र महापालिका करण्याचा विचार असून याबाबत बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.

हवेली तालुक्यातील वाघोली येथे सातत्याने वाहतूक कोंडी, अपुरा पाण्याचा पुरवठा, सांडपांण्याचा प्रश्न यासह अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबतचा प्रश्न अशोक पवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले. पीएमआरडीएला काही मर्यादा आहेत. या मर्यादा लक्षात घेवून हवेली, वाघोली, खडवासला- बावधन आणि तापकिरचा काही भाग घेवून हवेली-वाघोली महानगरपालिका स्थापन करता येवू शकेल. तसेच ज्या पध्दतीने पुणे महानगरपालिकेपासून विभक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निर्मिती केली. त्याधर्तीवर याही महानगरपालिकेची स्थापना करता येवू शकेल. यासंदर्भात आमदारांची बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.+

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *