पहिल्यांदाच विधानसभेत आलेल्या हेमंत रासने यांना अजित पवार यांनी दाखविली जागा चूकून विरोधी बाकावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत रासने नंतर मात्र सत्ताधारी बाकावर

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत अनेक नव्या चेहऱ्याच्या उमेदवारांना संधी मिळाली. त्यात पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव करून विजय मिळविलेले हेमंत रासने हे यंदाच्या निवडणूकीत विजयी झाले. हेमंत रासने हे वास्तविक पाहता भाजपाच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडूण आलेले. तसेच त्यांची विधानसभा सभागृहातही पहिल्यांदाच हजर राहिलेले. मात्र चुकून विधानसभेत मोकळ्या असलेल्या जागेवर बसले. मात्र अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर हेमंत रासने यांना हाताला धरून नेत त्यांची बसायची जागा दाखविली. त्यामुळे सभागृहात काही काळ हास्यकल्लोळ उसळला.

राज्यात संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारचा नुकताच शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधाननांसह अनेक जण उपस्थित राहिले. १५ व्या विधानसभेवर निवडूण आलेल्या सर्व आमदारांचा नियमानुसार शपथविधी होणे गरजेचे आहे. या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी घेण्यासाठी विधानसभेचे खास अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली.

मात्र विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले. सुरुवातीला भाजपाच्या आमदारांनी शपथ घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी सुरवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेत असताना भाजपाचे पुण्याचे आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर हेमंत रासने यांनी आमदारांसाठी बसावयाच्या आमदारांच्या बाकावर बसले.

अजित पवार यांनी हेमंत रासने हे चुकीच्या स्थानी बसल्याचे लक्षात आले. मात्र इतरांच्या ते लक्षात आले नाही. अजित पवार यांनी त्यांची विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या आसानाकडे जाताना सत्ताधारी बाकाऐवजी विरोधी बाकावर बसलेल्या हेमंत रासने यांना त्यांच्या बसण्याच्या ठिकाणाची चूक झाल्याची बाब लक्षात आणून देत हेमंत रासने यांच्या हाताला पकडून त्यांना सत्ताधारी बाकावर आणून बसविले.

अजित पवार यांच्या या कृत्यामुळे काही काळ सभागृहात हस्याची लकेर उमटली. त्यावेळी हेमंत रासने ही गालातल्या गालात हसत अजित पवार यांचे आभार मानले.

About Editor

Check Also

महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय ग्रंथाचा सात भाषांमध्ये अनुवाद करणार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *