बाबरी विध्वंस प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला तो अपेक्षितच आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही- नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी

बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज न्यायालयाने निकाल दिला आहे तो अपेक्षितच होता. त्यामुळे आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत मांडले.

पुराव्याअभावी आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे. परंतु युट्यूबवर गेलात तर जगामध्ये व्हिडीओ उपलब्ध आहेत. ६ डिसेंबर अगोदर देशभरात झालेले कार्यक्रम आहेत. त्याच आधारावर केस तयार करण्यात आली होती. शेवटी हा न्यायालयाचा निकाल आहे त्याचा आम्ही आदर करत असल्याचे ते म्हणाले.

About Editor

Check Also

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चे पुरस्कार वितरण • सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक• हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *