प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीच्या प्रवक्ते पदी डॉ.संजय लाखे-पाटील यांची नियुक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून नियुक्ती

मुंबईः प्रतिनिधी
पक्षाला नवी उभी उभारी देण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे काम सुरु केले आहे. यानुसार राज्याच्या दुष्काळी आणि शेतकऱ्यांच्या समस्यावर काम करणारे डॉ. संजय लाखे-पाटील यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रचार समितीच्या सरचिटणीस आणि प्रवक्ते पदी नियुक्ती नुकतीच केली.
डॉ.संजय लाखे-पाटील हे प्रचार समितीचे प्रवक्ते  म्हणून मांडणार आहेत. तसेच राज्याच्या प्रचार समितीच्या सरचिटणीस पदाचेही काम पाहणार आहेत. डॉ.पाटील यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर आपतकालीन यंत्रणा स्वतंत्ररित्या स्थापन न केल्याच्या विरोधात राज्य सरकारच्या विरूध्द मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या निवडीबाबत डॉ.संजय लाखे-पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात आणि प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी ‘राज्याच्या प्रचार समिती’ च्या सरचिटणीस पदी आणि प्रवक्ते पदी निवड केल्याबद्दल केल्याबद्दल मी दोघांचाही ऋणी आहे असल्याची भावना व्यक्त केली.

About Editor

Check Also

डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने अभ्यासू, संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड काँग्रेसकडून श्रद्धांजली अर्पण- हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *