काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या प्रचार सभांचा विदर्भात झंझावात

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु असून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचा झंझावातही सुरु झाला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उद्या शनिवार १३ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील गजानन महाराज मंदिराच्या मैदानात जाहीर सभा होत आहे. या प्रचार सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

रविवार १४ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे नागपुरातील गोळीबार चौक येथे दुपारी ४ वाजता प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होत आहे, त्याआधी सकाळी मल्लिकार्जून खर्गे हे दिक्षाभूमीला भेट देणार आहेत.

नागपुर, रामटेक, भंडारा-गोदिया, गडचिरोली-चिमूर व चंद्रपूर या विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील निवडणुक होत असून या पाचही मतदारसंघात काँग्रेस व महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतलेली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनिल केदार यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली, चौकसभा यासह घरोघरी जाऊन मतदारांना भेटण्यावरही भर दिला जात आहे. या पाच मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होत आहे.

About Editor

Check Also

एसआयआर प्रक्रियेविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत रॅली, ठाकरे बंधूंचे आवाहन, विरोधी पक्षांना निमंत्रण

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *