माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग अनंतात विलीन निगमबोध घाटावार शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यावर आज दुपारी अखेर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिक काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात आले. जवळपास तास-दोन तास काँग्रेस मुख्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव नियम बोध घाट येथे नेण्यात आले आणि धार्मिक पद्धतीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलीने मुखाग्नी दिला.

डॉ मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नियमबोध घाट येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु , काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसमधील अनेक नेते हजर होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आदी उपस्थित होते. यांच्याशिवाय मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री, भूतानचे राजे, पॅलेस्टाईनचे राजदूत, अफगाणिस्तान, इराण सरकारमधील मंत्री उपस्थित होते. या सर्वांनी डॉ मनमोहन सिंग यांना अखेरची आदरांजली वाहिली. तसेच लष्कराच्या अधिकाऱ्यांनीही यावेळी डॉ मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली.

त्याचबरोबर मॉरिशसने माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधना बद्दल राष्ट्रीय शोक जाहिर केला असून त्यांच्या देशाचा राष्ट्रध्वजही अर्ध्यावर खाली उतरविण्यात आला तेथेही राष्ट्रीय शोक जाहिर करण्यात आला आहे. दरम्यान, डॉ मनमोहन सिंग यांना लष्कराच्यावतीने तीन वेळा फायरिंग करत मानवंदना देण्यात आली.

यावेळी डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर गुरूबाणीतून प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर डॉ मनमोहन सिंग यांच्या मुलीने मुखाग्नी दिला.

काँग्रेस मुख्यालय ते नियमबोध घाटावर अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येत असताना काँग्रेसचे कार्यकर्त्ये लष्कराच्या गाडीसोबत धावत होते. तसेच ते डॉ मनमोहन सिंग यांच्या विजयाच्या घोषणा देत डॉ मनमोहन सिंग अमर रहे च्या घोषणा देत होते. तसेच नियमबोध येथेही डॉ मनमोहन सिंग अमर रहे अशा घोषणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत हो़त्या.

About Editor

Check Also

अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत ‘विजाभज’ आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *