Tag Archives: amit shah

कन्हैया कुमार यांची मागणी, देणगी चोरीची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा, ट्रस्ट बरखास्त करा प्रभूरामाचे दान चोरणे महापाप, कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी चाललेला खेळ काँग्रेस खपवून घेणार नाही

भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू धर्माशी काहीही देणेघेणे नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते धर्माचा वापर करत असून त्यांचा एकच राम आहे आणि तो म्हणजे नथुराम, प्रभुरामाशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही. रामभक्तांनी प्रभू रामाला भक्तीभावाने पैसे, सोने, चांदी दान केले, त्यावर भाजपा आरएसएसच्या लोकांनी दरोडा टाकला आहे. प्रभूरामाच्या नावावर कोट्यवधींची …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, आधी परकीयांनी लुटली, आता बदला म्हणून हिंदूच आपली मंदिरं लुटत आहेत का ? भक्तांचे दान पळवापळवी करण्या इतपत मन कोडंग झालय का ?

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. …

Read More »

एकनाथ शिंदे यांची घोषणा, ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार

४० आमदारांपासून सुरू झालेल्या २०२२ च्या राजकीय उठावानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “आता एक नाही तर सहा टायगर आमच्यासोबत आहेत. चौकार नाही, …

Read More »

अमित शाह म्हणाले, आता एकच शिवसेना राहिली… कोल्हापूर येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांना लगावला टोला

मागील काही दिवसांपासून भाजपाच्या मदतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षातील खासदारांना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबविण्यात येत असल्याची चर्चा होती. त्यातच शिवसेना उबाठातील सहा खासदार ही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु होती. अखेर शिवसेना उबाठातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने …

Read More »

अमित शाह यांची माहिती, १५०० कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर कॉरिडॉरचे काम सुरू कृतज्ञता सोहळ्यात बोलताना अमित शाह यांची माहिती

दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर शासनाच्या तब्बल १५०० कोटी रुपयांच्या निधीतून खर्च करून हा परिसर विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे उत्तर, ३० वर्षे भाजपासोबत राहून शिवसेना विसर्जित केली नाही.. तर शिवसेना उबाठा पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शिंदे शिवसेनेला दिले प्रतित्तुर

शिवसेना पक्षाला ६० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आयोजित वर्धापन दिना निमित्त मांटुगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे शिवसेनेकडून शिवसेना उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपा आणि शिंदे शिवसेनेकडून करण्यात येत होता. त्या आरोपाला उत्तर देताना शिवसेना …

Read More »

राहुल गांधी यांचे भाकित, नरेंद्र मोदी वर्षभरही पंतप्रधान पदावर टीकणार नाहीत मोदी सरकार संस्थात्मक बंडाला सामोरे जाण्याच्या स्थितीत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षभरात पदावर टिकणार नाहीत. मोदी सरकार एका “संस्थात्मक बंडा”चा सामना करत असून, त्याबद्दल राहुल गांधी यांनी व्यवस्थेमधूनच “आतली माहिती” मिळत असल्याचा दावाही केला. बुधवारी (३ जून, २०२६) काँग्रेसच्या राष्ट्रीय आदिवासी व्यावसायिक संमेलनात, पक्षाच्या एका बंद दाराआडच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन,  व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवर अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी …

Read More »

अमित शाह यांची घोषणा, अनैसर्गिक लोकसंख्या शास्त्रीय बदलाच्या तपासणीसाठी समितीची स्थापना एक्सवरील एक पोस्ट करत दिली माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी अवैध स्थलांतर आणि इतर अनिर्दिष्ट घटकांमुळे होणाऱ्या ‘अनैसर्गिक लोकसंख्याशास्त्रीय बदला’ची तपासणी करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीच्या स्थापनेची घोषणा केली. त्यांनी या समस्येला भारताचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक संतुलन आणि आदिवासी समाजांच्या संरक्षणास एक मोठे आव्हान म्हटले आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, गेल्या …

Read More »

छगन भुजबळ यांची माहिती, जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर करण्यात आला आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे दिली. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन …

Read More »