महात्मा जोतीबा फुले व सावित्रीमाई फुलेंना ‘भारत रत्न’ द्या खासदार वर्षा गायकवाड यांची संसदेत मागणी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले या महान विभूतींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्नने गौरवण्यात यावे, अशी शिफारस करणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने पारित केला, त्याचा आनंद आहे. काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी २०१५ साली फुले दांपत्याला भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी लोकसभेत केली होती. आता केंद्र सरकारने सर्व जाणीव जागृतीची दखल घेऊन विलंब न लावता फुले दांपत्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारत रत्न’, जाहीर करावा, ही मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

खासदार प्रा. वर्षा गायकवाड  म्हणाल्या की, क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्रीशक्तीची मुहूर्तमेढ रोवली आणि पुढे लेकी-पोरींचा उद्धार झाला. आज मी एक खासदार आहे, ते जोतीबा आणि सावित्रीमाई यांच्या संघर्षामुळेच. उपेक्षित-वंचितांच्या सेवेत फुले दांपत्याने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजाच्या जडणघडणीत अनन्यसाधारण असे योगदान दिले आहे. त्यांचे आदर्शवत विचार हे कायमच प्रेरणादायी राहतील असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाच्या वेदना व दुःख भाजपा महायुतीला कळलेच नाही, ५ हजारात दिवाळी कशी होणार ? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका

राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाने पुरता हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हातातून गेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *