Tag Archives: वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईचे सिंगापूर करण्याची वल्गणा करणाऱ्यांनी शहराची कचराकुंडी बनवली मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीवर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर, जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मुंबईत पायाभूत सुविधांची पुरती वाट लागली असून शहर पूर्णपणे बकाल केले आहे, हे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विकास कामाच्या नावाखाली मुंबईची तिजोरी साफ करण्याचे काम सुरु असून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या कामावर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर आहेत. भ्रष्टाचार व टक्केवारीत मग्न असलेल्यांना न्यायालयाने मोठी चपराक …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपाने सेंच्युरी मिलची १३ हजार कोटींची जमीन कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातली सेंच्युरी मिलचा लीज प्रस्ताव ताबडतोब थांबवा आणि गिरणी कामगारांचे ऑनसाइट पुनर्वसन सुनिश्चित करा

मोदी सरकार सरकारने सत्तेत आल्यापासून देशाची सार्वजनिक संपत्ती खास उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सपाटा लावला असून मुंबईतील धारावी, रेल्वे, मिठागरांच्या जमिनींपासून बीएमसीच्या मोक्याच्या भूखंड खास लोकांनाच विकले आहेत. २२ BEST डेपो, वरळी लॅबोरेटरी-प्लांट, मदर डेअरी, देवनार व मुलुंड डंपिंग ग्राउंड यांसारख्या सार्वजनिक जमिनी बहाल केल्यानंतर आता लोअर परळमधील सेंच्युरी मिलची जमीनही …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, वांद्र्यातील अपघात प्रकरणी कार चालक महिलेला कठोर शिक्षा करा वांद्र्यात कार अपघातात मृत्यू पावलेल्या अंश गुप्ताच्या आई वडिलांची वर्षा गायकवाड यांनी घेतली सांत्वनपर भेट

वांद्रे पश्चिम येथे रविवारी एका कार अपघातात  ८ वर्षांच्या अंश गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना मनाला वेदना देणारी आहे. या अपघाताची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन कार चालक महिलेवर कठोर शिक्षा होईल अशी कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीसह न्याय मिळावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, जालन्यात बैल विक्रीच्या आरोपातून दलित तरूणाला शेण खायला लावल्याचा संतापजनक प्रकार भाजपा सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले, गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात गुंडगिरी, फडणवीस सरकारचे मात्र दुर्लक्ष

जालन्यात दलित तरुणावर बैल विक्रीचा आरोप करत मारहाण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि त्याला शेण खायला भाग पाडल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे, त्याच्या ११ वर्षांच्या मुलालाही अशीच अमानुष वागणूक देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे, …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला आरक्षण विधेयकावरून भाजपा व मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिशाभूल भाजपाची मानसिकताच महिलाविरोधी, पुण्यातील ‘छात्रों की गुंज’मधून मुलींनी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला तर भाजपाला पोटदुखी का झाली?

वर्षा गायकवाड

महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा विरोध आहे असा खोटा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. काँग्रेस पक्षानेच महिला आरक्षणचा निर्णय देशात सर्वात आधी घेऊन तो लागूही केला पण भाजपाची महिला विरोधी मानसिता असल्यानेच २०२३ मध्ये संसदेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊनही भाजपाचे काही बोलघेवडे नेते …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अशोक नगरमधील डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेले मृत्यू ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी कुर्ला पश्चिम आणि घाटकोपर पश्चिममधील धोकादायक भागांचे ऑडिट करून संरक्षक भिंत बांधण्याची मागणी एप्रिलमध्ये करूनही बीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

कुर्ला पश्चिमेतील अशोकनगर येथे डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला, ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडतात व त्यानंतर प्रशासनाला जाग येते.वारंवार अशा घटना घडत असूनही बीएमसीला जनतेच्या जीवाचे काहीही पडलेले नाही. पावसाळ्यापूर्वीच प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून सुरक्षेसाठी ठोस …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मंत्रिमंडळ व विधिमंडळाचा प्रस्ताव सादर करूनही मोदी सरकारकडून दि बा पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ नाव देण्यास विलंब, स्थानिकांमध्ये नाराजी व संताप

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमधील प्रकल्पग्रस्त नागरिक आणि मूळचे आगरी-कोळी समाजबांधव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी दीर्घकाळापासून करत आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी (विधानसभा व विधान परिषद) २९ जून २०२२ रोजी एकमताने …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, महाराष्ट्रात औषध निर्मितीला चालना देण्याबाबत केंद्राने कोणत्या योजना आणल्या? गुंतवणूक व रोजगार निर्मिती किती झाली ?

केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत देशांतर्गत औषध निर्मितीला चालना देण्यासाठी आणि आयातित ‘ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स’ (APIs) वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कोणत्या योजना आणल्या आहेत. मंजूर किंवा सहाय्य मिळालेले औषध निर्मिती प्रकल्प किती आहेत. महाराष्ट्रात औषध निर्मीती क्षेत्रात गुंतवणूक किती झाली व त्यातून रोजगार निर्मिती किती झाली, असा तारांकित प्रश्न काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, टोलनाक्यावरील भ्रष्ट कारभार, दादागिरी व फास्टॅग मधून दुप्पट वसूलीला आळा घाला टोल नाक्यावर मारहाणीचे प्रकार

वर्षा गायकवाड

राज्यातील प्रमुख महामार्गावरील टोलवसुली ही वाहन चालक व मालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. टोलवसुली वरून अनेक टोलनाक्यांवर मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. महाराष्ट्रातील काही टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’  स्कॅनर्स मध्ये बिघाड आहे, टोलची चुकीच्या पद्धतीने दुप्पट कपात केली जात आहे, तर अनेक टोलनाक्यांवर अनधिकृत ‘फास्टॅग’ एजंट्सकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहेत. याबाबत तक्रारी करण्यात आल्या पण टोल नाक्यांवरील …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, धर्मेंद प्रधानांचा राजीनामा अहंकाराचा पराभव सत्य व संविधानाचा विजय

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा दयावा लागला पण त्यांच्या राजीनाम्याने हा प्रश्न संपत नाही. देशातील तरुणांनी लढा पुकारला की एक नवा इतिहास निर्माण होतो, आज तेच घडले असून कोट्यवधी तरुणांच्या दबावापुढे अहंकारी हुकूमशाहला झुकावे लागले आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा अहंकाराचा पराभव आणि सत्य व संविधानाचा …

Read More »