विधान परिषद निवडणूक प्रक्रियेस आयोगाकडून स्थगिती निवडणूक आयोगाकडून आचार संहिता मागे

मुंबई : प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाने दि. १४ मे २०१८ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या ‍द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकरिता लागू करण्यात आलेली आचारसंहिता मागे घेण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि. १२ मे २०१८ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण विभाग पदवीधर व नाशिक विभाग शिक्षक या मतदार संघाचा द्विवार्षिक कार्यक्रम घोषित केला होता.

About Editor

Check Also

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील काही तरतुदी आणि आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून राबवली जाणारी पद्धत ही अनुसूचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *