फुंडकरांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ३ ऑक्टोबरला मतदान भाजपामध्ये तिकिटासाठी चढाओढ

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या तीन ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत याची घोषणा केली.

विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्यांच्या माध्यमातून फुंडकर विधान परिषदेवर निवडून गेले होते. २४ एप्रिल २०२० पर्यंत त्यांचे सदस्यत्व होते. परंतु ३१ मे २०१८ रोजी फुंडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून निवडून आलेल्या सदस्याचा कार्यकाल २४ एप्रिल २०२० पर्यंत राहील.

या पोटनिवडणुकीसाठी १४ सप्टेंबरला अधिसूचना जारी होईल. २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. २४ सप्टेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २६ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. तीन ऑक्टोबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल. विधानसभेत सध्या भारतीय जनता पार्टीचे बहुमत आहे. विधानसभेत भाजपाचे सदस्य सर्वात जास्त असल्यामुळे इतर कोणताही पक्ष या पोनिवडणुकीसाठी आपला उमेदवार देण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे. पर्यायाने भाजपामध्ये आता तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *