आता विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस महाराष्ट्रातून स्व.महाजन, गडकरी यांच्यानंतर राष्ट्रीय राजकारणात तावडे तिसरे

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत राजकारणामुळे दुर्लक्षित राहीलेले विनोद तावडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी आज नियुक्ती केली. या पदावर विराजमान होणारे तावडे हे महाराष्ट्रातील भाजपाचे दुसरे नेते ठरले आहेत.

यापूर्वी या पदावर स्व. प्रमोद महाजन यांनी काम पाहिले होते. त्यांच्यानंतर आता विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा विद्यमान केंद्रीय परिवहन आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काम पाहिले. काही महिन्यांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी नवी कार्यकारणी जाहीर केली होती. त्यात तावडे यांना केंद्रीयस्तरावर संघटक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे यांनाही त्यावेळी संधी देण्यात आली होती. परंतु आता विनोद तावडे यांना बढती देत त्यांना थेट राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती देण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणातून काहीसे बाहेर पडल्यानतंर, आता विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यकारिणीत महत्वपूर्ण स्थान मिळालेलं आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्रातील जुने व संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपाचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपाने कापले होते. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांचा समावेश होता. मात्र आता भाजपाकडून या दोन्ही नेत्यांचे पुर्नवसन केलं जात असल्याचे दिसून येत असून कालच बावनकुळे यांना विधान परिषदसाठी भाजपाने त्यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर त्यानंतर आज विनोद तावडे यांची राष्ट्रीय स्तरावरील कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली गेली.

विनोद तावडे यांनी यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदही सांभाळलेलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून देखील काम केलेले होते. भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक मानले जात होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले व त्यानंतर ते राज्याच्या सक्रीय राजकारणातून दूर झाल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांपासून हरिणामध्ये भाजपाचे प्रभारी म्हणून देखील ते काम पाहत होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ पुणे - शिरुर, तळेगाव - चाकण - शिक्रापूर व हडपसर - यवत या उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *