मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडीला जाहीर पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडी ला जाहीर पाठिंबा असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी घोषणा केली.
यावेळी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष गुफरान अन्सारी, राष्ट्रीय प्रवक्ते मिरझा अब्दुल कय्युम नदवी, प्रदेशाध्यक्ष मुसा मुर्षद, महाराष्ट्र युवा सचिव वसीम अन्सारी, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्र पक्षाला ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा जाहीर पाठिंबा आम्ही दिला असून आमची प्रदेश कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या 50 वर्षांपासून आम्ही मुस्लिम समाजासाठी काम करतोय. युतीचे सरकार आम्ही पाहिले पण आताचे युती सरकार हे अतिशय वाईट राजकारण करत आहे. ओबीसी समाजासाठी फक्त घोषणा करून घोर फसवणूक केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लाखो युवक बेरोजगार झाले आहेत. उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या मिळत नाही आहेत. याला जवाबदार कोण ? असा सवाल उपस्थित करत राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड अस्वस्थता आहे. निवडणुकीपूर्वी भारंभार आश्वासने देत हे दोन्ही पक्ष सत्तेत आले. पण बहुतांशी आश्वासनांची पूर्तता झालेलीच नसल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस सरकार मधील मंत्र्यांकडे मुस्लिम ओबीसी समाजासाठी वेळ मिळत नाही. मग हे सरकार हवं आहे तरी कशाला ? असा खोचक सवाल त्यांनी केला.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *