२४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात परिवर्तन झालेले असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आशावाद

मुंबईः प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यात आर्थिक मंदीचे संकट वाढले आहे. बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी अडचणीत आले आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. एकंदरीत जनता हे सरकार बदलले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे या मानसिकतेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत २४ तारखेला निकाल येईल त्यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित होणार आहे असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगाने २१ ऑक्टोबर ही मतदानाची तारीख जाहीर केली आहे. आम्हीही तयारीला लागलो आहोत. आम्हाला अपेक्षा होती की, २० – २१ ऑक्टोबरला निवडणूका होतील. परंतु ज्यापध्दतीने घटनेमध्ये तरतुद आहे.त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने निवडणूका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात असे सांगितले. त्या होतील याची अपेक्षा निवडणूक आयोगाकडून करतो अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत ५० टक्के मते सेना-भाजपाला मिळाली होती.मतविभाजनाचा फायदा झाल्याने त्यांच्या जागा जास्त आल्या.यावेळी जनतेला कळून चुकले आहे की, मतविभाजनामुळे सेना- भाजपाच्या जागा येत आहेत. मात्र यावेळी लोकं मतविभाजन टाळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *