महेश तपासे यांचा टोला, भाजपा हा मोठा दगड कधी दुसर्‍याच्या गळयात बांधून… चंद्रकांत पाटील यांना शिंदे सरकार असंविधानिक आहे हे माहीत आहे

शिंदेसरकार बेकायदेशीर आणि असंविधानिक पद्धतीने तयार झाले आहे असे लोकांची धारणा असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार चालणार नाही म्हणूनच भाजपाने आपल्या मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले आहे व येणाऱ्या काळात भाजपा आपल्या मनावर ठेवलेला हा मोठा दगड कधी दुसर्‍याच्या गळयात बांधून कुणाला बुडवेल? हे लवकरच पहायला मिळेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायला लागले आहे असे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलले याचा अर्थ त्यांना हे सरकार असंविधानिक आहे याची पूर्ण कल्पना आहे अशी जोरदार टीकाही महेश तपासे यांनी केली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिंदेसरकारचे भविष्य सर्वोच्च न्यायालयातमध्ये केलेली याचिका आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. दरम्यान महाराष्ट्रातील या राजकारणावर सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्यावर महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *