मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा संकल्पनांचा विकास आदींमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने यश मिळविले आहे. नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’ हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला. यामध्ये तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आले …
Read More »नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्ष सव्वालाखेंनी स्विकारला पदभार, म्हणाल्या… ‘शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे तीन काळे कायदे’ पुस्तकाचे प्रकाशन.
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांचा पदग्रहण सोहळा प्रांताध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दिमाखात पार पडला. काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांना न्याय देण्याचे काम केले आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा …
Read More »सरकारचा मोठा निर्णय : आदिवासी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणसाठी दिली जाणार शिष्यवृत्ती
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आदिवासी विकास विभागार्फत शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याचे कमाल वय ३५ वर्षे असावे. नोकरी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा …
Read More »सिरमची लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही मुख्यमंत्र्यांकडून सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी केल्यानंतर माहिती
पुणे : प्रतिनिधी सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. …
Read More »आंदोलनाला पाठिंबा देण्याआधी पवारांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आव्हान
मुंबईः प्रतिनिधी कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा वेळोवेळी आग्रह धरणाऱ्या शरद पवारांनी याच कायद्यातील सुधारणांविरोधात आंदोलन करणे म्हणजे पवारांनी स्वत: विरोधातच आंदोलन पुकारण्यासारखे आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, पक्षभेद विसरा- विकास कामासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा सर्वपक्षिय खासदारांच्या बैठकीत आवाहन
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करतानाच खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्याचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी …
Read More »जात प्रमाणपत्र न दिलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक शुल्काचा लाभ व्यावसायिक अभ्यासक्रमास संस्था स्तरावर प्रवेश मिळवलेल्यांना होणार फायदा
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप राउंड) माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमास राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा दिलासा मिळवून दिला. ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या अर्जाची पोहोच सोबत जोडली आहे, परंतु २० जानेवारीपर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही, अशा मेरिट …
Read More »मेट्रो कारशेड जागाबदलासाठी नवीन समितीचा निव्वळ फार्स, अहवाल आधीच तयार! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार करून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स करण्यात येत आहे. यातून मुंबईकरांना मेट्रो विलंबाने मिळेल आणि राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान होईल. याबाबत प्रशासकीय अधिकार्यांकडून मुख्यमंत्र्यांची मोठी दिशाभूल होत असल्याचा आरोप एका पत्राद्वारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »१०-१२ वीच्या परिक्षेच्या तारखा जाहिरः बालविवाह होवू नये यासाठी प्रयत्नशील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १० वी ची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येणार असून निकाल ऑगस्ट २०२१ मध्ये निकाल जाहिर करण्यात येणार आहे. तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधी घेण्यात येणार असून जुलै २०२१ मध्ये १२ वीचा निकाल जाहीर …
Read More »शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलासाठी “स्टार्स” प्रकल्पाची अंमलबजावणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण ( Strengthening Teaching-learning and Results for States- STARS ) करण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थसहाय्यित, केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश व केरळ अशा एकूण सहा …
Read More »
Marathi e-Batmya