राजकारण

राज्यातले सरकार हे अंहकारी, तुघलकी निर्णय घेणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अघोषित आणीबाणी असून विरोध करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांचा सर्रास वापर करत आहे. आमच्या व्यक्तीने एखादी पोस्ट टाकली तरी त्या व्यक्तीला धमकावलं जातयं, त्याच्यावर पोलिसी कारवाई केली जाते. अर्णव गोस्वामी, कंगणा राणावत प्रकरणी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने आणि दिलेला निकाल हा राज्य सरकारला चपराक लगावणारा आहे. त्यात तोंड …

Read More »

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर १५ जानेवारी रोजी होणार मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, एप्रिल …

Read More »

पवारांच्या वाढदिनामिमित्त राज्यातल्या दिव्यांग आणि स्पर्धा परिक्षार्थींसाठी दोन नवे अॅप नव्या अॅपच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातल्या प्रत्येक दिव्यांगाना देणगीदारांच्या माध्यमातून आवश्यक असलेली मदत मिळावी यासाठी महाशरद (mahasharad), स्पर्धा परिक्षार्थीं व अनुसूचित जातींसाठीच्या असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बार्टी (Barti) असे दोन मोबाईल अॅण्ड्राईड अॅप लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. हे दोन्ही अॅप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या …

Read More »

कृषी विधेयक फायद्याचे असते तर शेतकरी रस्त्यावर उतरला नसता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपाला टोला

मुंबई : प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषी विधेयक शेतकर्‍यांच्या फायद्याचं आहे असं केंद्र सरकार बोलत असेल तर शेतकरी या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. जनता दरबारासाठी उपमुख्यमंत्री …

Read More »

पीएम वायफाय म्हणजे एका विशिष्ट कंपनीच्या एकाधिकारशाहीसाठी केंद्राची पावले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. ही सगळी व्यवस्था देशात निर्माण होत चालली असून सर्व टेलिकॉम सेक्टरमध्ये एकाधिकारशाही निर्माण करण्याच्यादृष्टीने केंद्रसरकारची पावले पडत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. टेलिफोन बुथसारखी वायफाय सेंटर उघडण्याची …

Read More »

अखेर शालेय शिक्षण मंत्र्यांकडून तो आदेश रद्द; जुनी पेन्शन झाली लागू राज्यातील सर्व १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलासा

मुंबईः प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलैची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर आज शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सही केली. १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी …

Read More »

राज्य सरकारने दिली शरद पवारांना आगळीवेगळी वाढदिवासाची भेट या योजनेला दिले पवारांचे नाव

मुंबईः प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस असून या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावे योजना सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक …

Read More »

माजी आदीवासी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी निधन; भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला-देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजपाचा आदीवासी चेहरा असलेले आणि माजी आदीवासी मंत्री विष्णू सवरा यांचे आज संध्याकाळी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. मागील दोन वर्षापासून त्यांना यकृताचा त्रास होता. त्यांच्यावर पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीस होते. १९८० साली त्यांनी बँकेतील …

Read More »

खबरदार! महिला व बालकांवर अत्याचार कराल तर थेट फाशीवर लटकाल अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिक्षा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा आगामी अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात येणार असून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीला तात्काळ अटक करून १५ दिवसात तपास करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. …

Read More »

दानवेंचा अजब शोध, शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात शेतकरी आंदोलनाबाबत अजब तर्कट

जालना: प्रतिनिधी शेतकरी आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा धक्कादायक जावई शोध दानवे यांनी लावल्याने त्यांच्या वक्तव्याबाबत आर्श्चय व्यक्त केले. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकावले असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील …

Read More »