राजकारण

अरविंद बनसोड प्रकरणात गावगुंडांची दमदाटी गृहमंत्र्यांचा दरारा नसल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

नागपूर: प्रतिनिधी हे प्रशासन कुचकामी असून जातीयवादी गुंडांवर यांचा वचक नसल्याने हे गावगुंड पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. नागपुरातील अरविंद बनसोड हत्या प्रकरणातील आरोपींनी आता गावातील नागरिकांना दमदाटी करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या विरोधात कोणीही साक्ष देऊ नये म्हणून गेले पंधरा दिवस गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात …

Read More »

पूर टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणीप्रश्नी कर्नाटकच्या मंत्र्याशी चर्चा ७ जुलै रोजी दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री भेटणार

मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भागात असलेल्या नदीला पूर येवून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदाही अशी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे कर्नाटकचे जलसंपदा मंत्र्यांची चर्चा होणार …

Read More »

पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलीस उपायुक्तांना पुस्तकासह परिक्षा देता येणार विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये -गृहमंत्री देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलीस उपायुक्त यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून त्यांना परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी संबंधितांना पुरेसा कालावधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे सदर …

Read More »

पतंजलीने दिशाभूल केल्यास कडक कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई: प्रतिनिधी पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन …

Read More »

प्रितम मुंडे, चित्रा वाघ, भांडारी, राम शिंदेसह भाजपाची नवी कार्यकारीणी जाहीर केशव उपाध्ये बनले प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते

मुंबई: प्रतिनिधी सत्तेतून उतरल्यानंतर भाजपातील अंतर्गत राजकिय धुसफूस काही काळ थांबलेली असतानाच नाराज पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश महेता आणि पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी नाही किमान पक्ष संघटनेच्या कामात तरी सामावून घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर पक्ष संघटनेतही या नेत्यांना डावलत पंकजा मुंडे यांच्या …

Read More »

‘पुण्या’साठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

पुणे: प्रतिनिधी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी ‘टेस्टींग इन्चार्ज’ म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे …

Read More »

कोरोना संसर्गाचे प्रमाण देशापेक्षा मुंबईत जास्त ,तब्बल २८ टक्के मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहीत मुंबईतील कमी चाचण्यांकडे फडणवीस यांनी वेधले पुन्हा लक्ष

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत सातत्याने कमी होत असलेल्या चाचण्या, त्यामुळे संसर्ग शोधण्यात येत असलेल्या अडचणी, मृत्यूसंख्येची अद्याप होत नसलेली फेरपडताळणी, मृतदेहांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे कोरोना योद्ध्यांनाच मदतीपासून वंचित रहावे लागणे, याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून …

Read More »

एम.पी.एस.सी. परीक्षार्थींसाठी आता ऑनलाईन कोचिंग क्लास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. करोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन …

Read More »

प्रियंका गांधी-वड्राजी एका महिन्याच्या आत घर खाली करा केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना केंद्र सरकारच्या नियमानुसार एसपीजी आणि झेड प्लस सुरक्षा असली तरी त्यांना सरकारी निवासस्थानात राहण्याची तरतूद नाही. त्यामुळे त्यांनी एका महिन्याच्या आत घर खाली करावे अशी नोटीस केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना बजाविली आहे. प्रियंका गांधी या सध्या काँग्रेसच्या नेत्या असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची …

Read More »

रोजगारविषयक मार्गदर्शन आणि ऑनलाईन कौन्सिलिंग आता प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारविषयक तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध रोजगारविषयक अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाईन कौन्सिलिंग सत्र आयोजित करण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान प्रायोगिक तत्वावर २४ व २५ जून रोजी उस्मानाबाद व सातारा येथे ऑनलाईन कौन्सिलिंग सत्राचे आयोजन करण्यात …

Read More »