राजकारण

असंघटीत कामगारांना ५ हजार: म.फुले आरोग्य योजनेतील रूग्णालयात मोफत कोरोना चाचणी काँग्रेसच्या टास्क फोर्सचा अहवाल सादर

मुंबई: प्रतिनिधी महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांची चाचणी मोफत करावी, असंघटीत कामगारांना ५ हजाराचा मदतनिधी द्यावा, शेतकऱ्यांना नव्याने कर्ज द्यावे, पीपीई किटवरील टॅक्स माफ करावा यासह विविध मागण्या आणि सुधारणांचा अहवाल काँग्रेस पक्षाच्या टास्कफोर्सने आज सादर करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी …

Read More »

या नोडल अधिकाऱ्यांचे पत्र असेल तरच मूळ गावी जाता येणार मंत्रालयातील नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार: काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील स्थलांतरीत कामगार, पर्यटक, यात्रेकरू आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या परराज्यातील मूळ गावी जाण्यासंदर्भात सातत्याने केंद्राकडे मागणी केल्यानंतर अखेर त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे आणि परवानगी दिली. त्यानुसार राज्य सरकारकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून जाहीर केले. त्याचबरोबर राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक यांनाही नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला यश : कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना गावी जाण्यास परवानगी मुंबईतील ६ लाखाहून अधिक कामगार घरी पोहोचणार

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात अडकलेल्या जवळपास १० लाख कामगारांना त्यांच्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून पर्यटक, विद्यार्थी यांनाही आपापल्या घरी जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला असून तसे आदेशही जारी करण्यात आले. विशेष म्हणजे परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

घरगुती वीज आकार ५ टक्के तर वाणिज्यिक व औद्योगिक वीज वापराचा आकार स्थिर ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने या काळात घरगुती वीज आकार ५ टक्क्यांपर्यत कमी करण्यात आला आहे. तसेच वाणिज्यिक-औद्योगिक वीजेवरील आकार तीन महिन्यासाठी स्थिर ठेवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. याशिवाय मुंबईसह राज्यात वीज पुरवठा करणारे अदानी, टाटा, बेस्ट व महावितरण …

Read More »

खुशखबर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० – २१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना निश्चित किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेवून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना चालू वर्षी …

Read More »

शेलार म्हणाले गायकवाडांना, शाळा फी वाढवतायत किमान आदेश तरी काढा माजी शिक्षण मंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना आणि लाँगडाऊनमुळे प्रत्येकाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची फी वाढ शासनाने रोखावी उलट फी मध्ये कमीतकमी १० टक्के सूट द्यावी, अशी विनंती आज माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी विद्यमान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना केली. …

Read More »

कोटा येथे अडकलेले ३२ विद्यार्थी रायगडकडे रवाना पालकमंत्री आदिती ठाकरे यांची माहिती

अलिबाग: प्रतिनिधी राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आज २८ रोजी पहाटे कोटा …

Read More »

कुडाळ तहसीलदारांचे ते पत्र अखेर रद्द माहिती जमा करण्याच्या उद्देशासाठी आदेश होता

मुंबई: प्रतिनिधी ३ मे नंतर जर लॉकडाऊन वाढल्यास किंवा अडकलेल्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्याच्या उद्देशाने कुडाळमधून बाहेर परराज्यात, परदेशात आणि आपल्या मूळ गावी जावू इच्छिणाऱ्या व्यक्तींची माहिती जमा करण्यासाठी ते आदेश जारी करण्यात आले. मात्र ते कार्यालयीन कामकाजासाठी असलेले पत्र बाहेर आल्याने सदरचे ते पत्र रद्द करण्यात आल्याचा कुडाळच्या …

Read More »

सोशल मिडीया नियमांचा भंग? केंद्रीय मंत्र्यांचेच अकाऊंट ब्लॉक पंतप्रधानांना पत्र लिहीत पेड ट्रोलिंग चालवित जात असल्याचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी ट्विटर, फेसबुक यासह इतर सोशल मिडियावर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून बारीक लक्ष ठेवण्यात येते. मात्र केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सोशल मिडीयाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचे अकाऊंट ट्विटरने ब्लॉक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी हेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत सरकार आणि …

Read More »

कोविड विरोधी लढ्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कर्मचारी मध्यवर्ती महासंघाकडून उपमुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, …

Read More »